Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

औरंगाबाद शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्तावरच गुन्हा दाखल

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
औरंगाबाद शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्तावरच गुन्हा दाखल


औरंगाबाद-औरंगाबाद शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्तावरच (ACP - Assistant Commissioner of Police) शहरातील सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यामुळे औरंगाबाद पोलीस दलात एकच खळबळ उबाली आहे.  नाईट ड्युटीवर असताना या पोलीस अधिकाऱ्याने रात्री 2 वाजेच्या सुमारास एका घरात घुसून महिलेची छेडछाड केल्याच्या प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे (Vishal Dhume) रात्री एका हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मित्र आपल्या पत्नीसोबत त्याठिकाणी आले होते. तिथे दोघांची भेट झाली. ढुमे यांनी आपल्याकडे गाडी नसल्याचं सांगत मित्राकडे लिफ्ट मागितली. त्यानंतर मित्रानं त्यांना आपल्या गाडीत बसवलं. मात्र, गाडीत बसल्यानंतर ढुमे यांनी दारुच्या नशेत मित्राच्या पत्नी महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली.
त्यानंतर काही अंतरावर गेल्यावर त्यांनी वॉशरुमला जायचं कारण पुढं करत तुमच्या घरी घेऊन चल अशी विनंती मित्राला केली. घरी गेल्यानंतरही ढुमे यांनी महिलेची छेड काढली. तसेच पीडित महिलेच्या पतीला मारहाण केली. 
 तर याप्रकरणी शहरातील सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) असे या अधिकाऱ्याचे नाव असुन या घटनेनंतर या अधिकार्याची तडका फडकी कंट्रोल रूम मध्ये बदली करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
Previous Post Next Post