गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
शिरुर अनंतपाळ पोलिसांची गावठी दारूवर धाड
बाबूराव बोरोळे
शिरूर अनंतपाळ
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील घुग्गी ( सांगवी ) येथे सुधाकर भिकाजी राठोड हे विनापासपरवाना बेकायदेशीररीत्या चोरटी दारू विक्री व्यवसाय उद्देशाने गावठी दारू स्वतःच्या घरी बाळगल्याची गुप्त माहिती दि . १५ ( रविवारी ) रोजी साकोळ बिट आंमलदार दयानंद वासुदेव यांना मिळाली त्या गुप्त माहिती आधारे बिट आंमलदार दयानंद वासुदेव यांनी पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या मार्गदर्शनाखाली तात्कळ घुग्गी ( सांगवी ) येथे जाऊन सुधाकर भिकाजी राठोड यांच्या घरात धाड टाकली असता त्यांना ५० लिटर गावठी हातभट्टी दारू किमंत २ हजार रुपयाचा माल स्वतःच्या फायदेसाठी सुधाकर भिकाजी राठोड यांच्या कब्जात बाळगलेला मिळुन आला . त्यामुळे सुधाकर भिकाजी राठोड यांच्याविरुद्ध बिट आंमलदार दयानंद वासुदेव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या मार्गदर्शनाखाली बिट आंमलदार दयानंद वासुदेव हे करीत आहेत .