गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
चांडेश्वर शिवारात स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा ,
10 जनांनवर गुन्हा दाखल तर तिन फरार
11 लाख 22 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
लातूर- या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते.त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण श्री सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक श्री गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविली.
अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 01/01/2023 रोजी सायंकाळी 1800 वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील चांडेश्वर शिवारातील मन्मत शिवमूर्ती धरणे याचे शेतात छापा मारला असता तेथे इसम नामे-
1) राम शिवाजी गायकवाड ,वय 32 वर्ष ,राहणार खोपेगाव तालुका जिल्हा लातूर
2) ऋषिकेश रवींद्र घुगे ,वय 20 वर्ष, राहणार साईधाम अपार्टमेंट लक्ष्मी नगर लातूर
3) प्रकाश मधुकर चेवले ,37 वर्ष, राहणार हिप्परसोगा तालुका औसा
4) निखिल महादेव वाकडे ,वय 28 वर्ष ,राहणार शाळे गल्ली, लातूर.
5) मानस उर्फ महादेव साठे, वय 21 वर्ष, राहणार अंबाजोगाई रोड, केशवनगर, लातूर.
6) मन्मत शिवमूर्ती धरणे, राहणार पेठ.
तालुका लातूर
7) प्रसाद जगताप ,राहणार पेठ तालुका जिल्हा लातूर.
8) प्रणव कांबळे, राहणार ओसवाडी तालुका जिल्हा लातूर.
9) हनमंत भागवत मोरे, राहणार खोपेगाव तालुका जिल्हा लातूर.
10) अल्पवयीन बालक
असे नमूद ठिकाणी ग्रुप करून स्वतःच्या फायद्यासाठी घेऊन पत्त्यावर पैसे तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम व वाहने असा एकूण 11 लाख 22 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून वर नमूद इसमा पैकी इसम नामे
मन्मत धरणे
प्रसाद जगताप
प्रणव कांबळे
असे तिघे पोलीसाची चाहूल लागताच सदर ठिकाणाहून पळून गेलेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नमूद आरोपी विरोधात पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे 12(अ) मुंबई जुगार अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद मुद्देमाल व सहा इसमांना पुढील तपास कामी लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य, सहाय्यक फौजदार संजय भोसले, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, सुधीर कोळसुरे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, सिद्धेश्वर जाधव, योगेश गायकवाड, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, नकुल पाटील यांनी केली आहे.