गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
बेहिशोबी मालमत्तेवरून तलाठ्याच्या पत्नी व वडीलासह गुन्हा दाखल.
लातूर-राज्यामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये लोकसेवक म्हणून वावरणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या पदाचा गैरवापर करताना आपण वेळोवेळी पाहत आलो असाल, आमजणते मधून एखाद्या साधारण नागरिक जेव्हा शासकीय अधिकाऱ्याच्या दालनामध्ये जातो तेव्हा नागरिकाला त्याचे काम करून घेण्यासाठी अधिकाऱ्याला मलिदा दिला तरच त्याचं काम योग्य वेळी होऊ शकतं.असा गोड गैरसमज सध्या जनतेमध्ये दिसून येतो, तर याच लाचखोर अधिकाऱ्यांचा विरोधी विभाग म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो(ACB) या विभागा मार्फत यालाचखोर अधिकाऱ्यांची योग्य जागा दाखवून देण्याचे काम या विभागामार्फत योग्यरीत्या पार पाडले जाते.असाच एक प्रत्यय अडीच वर्षाखाली म्हणझेच दि 30 ऑगस्ट 2020रोजी एका तलाठ्याला लाच घेताना पकडण्यात आले होते.या तलाठ्याने केवळ तीन ठिकाणी काम करून, बेहिशोबी मालमत्ता म्हणजेच प्राप्त उत्पन्नाच्या तुलनेसमोर 98.65% बेहिशोबी मालमत्ता म्हणजेच अपसंपदा आढळून आली आहे.या तलाठी महोदयाकडे तब्बल 34 लाख 75 हजार 886 रु बेहिशोबी मालमत्ता मिळून अल्याने तलाठी त्याची पत्नी व त्याचे वडील यांच्या विरोधात जळकोट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.तलाठी ज्ञानोबा हणमंतराव करमले, वय 35 वर्षे, पद-तलाठी, सध्या नेमणूक बोरगाव(बु.)कोदळी, तहसील उदगीर जि.लातूर., रा. हांगरगा, ता. मुखेड जि. नांदेड.
व त्याची पत्नी अलका ज्ञानोबा करमले, वय 23 वर्षे, गृहिणी, रा.हांगरगा, ता.मुखेड जि. नांदेड.
तसेच तलाठ्याचे वडील हणमंतराव निवृत्ती करमले, वय 64 वर्षे रा. हांगरगा, ता. मुखेड जि. नांदेड.या तिघांवर्ती गु.र.नं. 21/2023 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 13(1)(ई) सह 13 (2) व भारतीय दंड संहिता चे कलम 109 आणि भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 (सुधारणा-2018) चे कलम 13(1)(ब) सह 13(2), 12 अन्वये यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केल्यानंतर ज्ञानोबा करमले यांच्या घराची व कार्यालयाची झडती घेण्याची प्रक्रिया पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, अन्वर मुजावर यांच्या पथकाने सुरू केली आहे.यासाठी जमादार रमाकांत चाटे, फारूख दामटे,भागवत कठारे,शाम गिरी,पोलीस नाईक संतोष गिरी,पोलीस कर्मचारी शिवशंकर कचवे, आशिष क्षीरसागर,दीपक कलवले,संदीप जाधव, मंगेश कोंडरे,गजानन जाधव,रुपाली भोसले, चालक पोलीस संतोष क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला आहे.
अँटी करप्शन ब्युरो लातूर यांच्या वतीने नागरिकांना आव्हान करण्यात येते की!
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्य काळामध्ये भ्रष्टाचार करून अपसंपदा धारण केली असेल, किंव्हा शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधिक्षक,
अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड
मोबाईल नंबर – 09623999944
पंडीत रेजितवाड, पोलिस उप अधीक्षक,
अँटी करप्शन ब्युरो, लातूर
मोबाईल नंबर – 09309348184
अँटी करप्शन ब्युरो, लातूर दुरध्वनी – 02382-242674
@ टोल फ्रि क्रं. 1064