गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर मध्ये गुंगीचे औषध देऊन शेतात मुलीवर लैंगिक अत्याचार!
पीडितेच्या तीन मैत्रिणींसह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल
लातूर:पार्टी करू असे सांगत एका अनाथ मूलीवर अंबाजोगाई रोडवरील एका शेतात गुंगीचे औषध पाजवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे. पीडित मुलीच्या तीन मैत्रीनीच्या मदतीने एका अँटोरिक्षाचालकाने हा किळसवाना प्रकार केला असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशन मध्ये पाच जनांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"लातूर मध्ये दिवसेंदिवस मुलींवर आत्याचाराचे प्रमाण वाढत चालले असून महिला आयोगाच्या राज्य अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काही महिण्यापुर्वी लातूर मध्ये आले असताना त्यांच्या तपासणी मध्ये लातूर मध्ये महिलावरील आत्याचाराचे प्रमाण कमी झाले आहे असे सांगण्यात आले होते परंतू त्यात तीळ मात्र फरक पडलेला दिसत नाही .यावर आता पोलिस प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची अवश्यक असल्याचे बोलले जात आहे.शहरातील अनाथ मुलींंच् संरक्षण हे अतिशय महत्वाचे असुन त्यावर ठोस उपाययोजना करणे अवश्यक बनले आहे. लातूर मध्ये अवैध मार्गाने गुंगीचे औषधे,झोपीच्या गोळया, गर्भनिरोधक गोळयांचे प्रमाण वाढत आहे.यावरही पोलिस प्रशासनाने वेळीच लक्ष घालून कार्यवाही करने अवश्यक बनले आहे."
या संदर्भात अधक माहिती अशी की शहरातील एका महाविद्यालयत शिक्षण घेणारी १६ वर्षीय अनाथ मुलगी लातूर मध्ये वास्तव्यास असून
दि १८ जानेवाली रोजी नेहमी प्रमाणे कॉलेज मध्ये गेली होती. दुपारी कँटीनमध्ये बसल्यानंतर तिच्या अन्य तीन मैत्रिणी तिथे आल्या आणि आपण पार्टी करु असे सांगत अंबेजोगाई रोडवरील एका निर्जन स्थळी शेतात नेले यातील एका मैत्रिणीने आपल्या नवन्याला फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. तिचा पती घटनास्थळी आला तेव्हा एक अटोरिक्षा चालकही आला होता. त्यानंतर त्यांनी या मुलीस गुंगीसारखे काही तरी पाजले आणि आटोचालकाने तिच्यावर
लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने विरोध करताच तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शुद्ध हरपली आणि सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास सदर अँटोरिक्षा चालकाने सोडले ती शुध्दीवरआल्यावर हिने एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन पीडित मुलीच्या तीन मैत्रिणी आणि मैत्रीणीचा पती,आटो चालक याच्यावर गुरन ४९/२३ कलम २०६ (२) RC ५०६, ३४ भावसह कलम ३(अ) (क) (१)(२) ७८ संरक्षण अधिनियम २०१२ करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे हे करत आहेत.