Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पत्रकारांच्या पाल्यांना देणार”आयआयबी” जेईई/नीट कोचिंगसाठी २५ टक्के स्कॉलरशिप

पत्रकारांच्या पाल्यांना देणार”आयआयबी”   जेईई/नीट कोचिंगसाठी २५ टक्के स्कॉलरशिप




लातूर : जिल्ह्यात मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, सोशल मीडिया आदी प्रसारमाध्यमांतील
कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना जेईई/नीट कोचिंगसाठी २५ टक्के स्कॉलरशिप देण्याची घोषणा देशातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या IIB इन्स्टिट्यूटच्या वतीने करण्यात आली आहे. लातूर जिल्हा प्रसारमाध्यमांच्या कार्याचे कौतुक करण्याच्या उद्देशाने हा शिष्यवृत्ती उपक्रम राबविण्यात आल्याचे आयआयबी इन्स्टिट्यूट, लातूरचे डायरेक्टर प्रा. चिराग सेनमा यांनी सांगितले.

IIB इन्स्टिट्यूट ही नांदेड, लातूर, पुणे आणि कोल्हापूर येथे स्थित नीट/जेईई तयारीसाठी एक प्रमुख अग्रगण्य कोचिंग संस्था आहे. आयआयबीच्या वतीने दरवर्षी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करते. याशिवाय पोलीस दलातील, सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या, शेतकऱ्यांच्या पाल्यांसह आदिवासी भागातील दुर्बल, दुर्लक्षित घटकातील होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी आयआयबी इन्स्टिट्यूटच्या वतीने दिली जाते. आजपर्यंतच्या या शिष्यवृत्ती कार्यक्रमामुळे हजारो विद्यार्थ्यांना नीट/जेईई या परीक्षेसाठी परवडणाऱ्या शुल्कात शिक्षण मिळाले. आयआयबीने आपल्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा विस्तार करत माध्यम क्षेत्रात कार्यरत पत्रकारांच्या पाल्यांना फीमध्ये 25 टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. ही स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक हे प्रसारमाध्यमात कार्यरत असावे, विद्यार्थ्याने IIB फास्ट परीक्षा दिली असावी, विद्यार्थी हा इयत्ता 10 वी तुन इयत्ता 11 वी मध्ये जाणारा असावा.
प्रवेशाच्या वेळी मुलाचे आणि पालकांचे आधार कार्ड आवश्यक असेल, माध्यम कर्मचारी म्हणून कर्मचाऱ्याचे ओळखपत्र आणि फर्म/कागद/कंपनीचे कर्मचारी पत्र आवश्यक आहे. हा उपक्रम
लातूर जिल्ह्यातील जिल्हा, तालुका, ग्रामीण माध्यम कर्मचारी यांच्यासाठी लागू असून केवळ पीसीएम आणि पीसीबी गटासाठी शिष्यवृत्ती लागू असेल असे आयआयबी इन्स्टिट्यूटने कळविले आहे.


Previous Post Next Post