गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
२२ कोटींच्या अपहार प्रकरणात जिल्ह्यातील संबंधित तहसीलदारांची होणार चौकशी
मग आपण मागील दोन वर्ष मुग गिळून गप्प का होतात ..
लातूर-
"मोठ्या शिताफीने मुख्यमंत्री सहायता निधि,जिल्हाधिकार्यांचे बॅंक खाते आणि तहसीलदारांच्या बॅंक खात्यातील २२कोटीचा अपहार एक साधा कारकुन करतो हे न पचण्यासारखे आता उघड होवू लागले आहे यामध्ये संबंधित तहसीलदार यांच्यावर कार्यवाही करण्याचे अधिकार आपणास नाहित हे मान्य आहे परंतू आपणास चौकशी तर करता येत होती ना..?मग आपण मागील दोन वर्ष मुग गिळून गप्प का होतात का..?२०१५पासुन अतिशय महत्वाचे असे हे सर्वसामान्य जनतेचे पैशे असलेले हे खाते, त्यास आपणास पाहण्यासाठी वेळ नाही,मग आपण नेमके त्या खुर्चीवर बसुन काय करत होतात..?असे गंभीर प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.एका जिल्हाधिकार्यांकडून चुक होवू शकते परंतु तिन,तिन जिल्हाधीकारी आणी सोबत तहसीलदारांचा फौजफाटा हे काय नावालाच आहेत का..? सर्वसामान्य जनतेचा पैसा घशात घालणार्या प्रत्येकावर कार्यवाही करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.गुन्ह्याची व्याप्ती बघता पोलिस तर कार्यवाही करणारचं आहेत,हा तपास उद्याचालून आर्थिक गुन्हेशाखेला जाईलही परंतु आपण एक जिल्हाधिकारी आणि जबाबदार म्हणुन काय करत आहात, या संबंधीत सर्व लोकांवर खातेनिहाय चौकशी चालू करावी अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता करत आहे."
लातूर मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात एका कारकुनाने २२कोटीचा अपहार केल्याने एकच खळबळ उडाली होती या२२ कोटींच्या अपहार प्रकरणात जिल्ह्यातील पाच तहसीलदारांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे, त्यासंबंधीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांद्वारे शासनाकडे पाठविणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. प्रस्तूत प्रकरण २०१५ ते २०२२ दरम्यान, घडलेले आहे. दोषी तहसीलदारांवर मला कारवाई करता येत नाही. या प्रकरणाचा प्रस्ताव येत्या पंधरा दिवसांत
विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. २२ कोटी अपहार प्रकरणात जिल्ह्यातील पाच तहसीलदार गुंतल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा मोठा विषय आहे. अपहार प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. संबंधितानी पैसे काढून काय केले. कुठे वापरले याचा शोध पोलीस घेत आहेत. सुमारे आठ वर्षांपासून हा अपहाराचा प्रकार घडत होता. त्यामुळे तपास सुद्धा सुक्ष्म पद्धतीने केला जात आहे. यावर आपण लक्ष ठेवून आहोत. शेवटी मला तहसीलदारांच्या बाबतीत कारवाईचा प्रस्ताव द्यावा लागेल. तो येत्या पंधरा दिवसांत देऊ, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले आहेत.