डिजिटल मिडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्ष पदी गोपाळ कुलकर्णी यांची निवड
*मुंबई : प्रतिनिधी*
*गोपाळ नारायण कुलकर्णी यांची लातूर जिल्हा डिजिटल मिडिया परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे.. ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी असेल अशी घोषणा डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी आज केली आहे..गोपाळ कुलकर्णी हे माध्यम वृत्तसेवा नावाचे युट्यूब चॅनल चालवितात.. दर्जेदार युट्यूब चॅनल म्हणून वाचकांची त्याला पसंती मिळाली आहे.. गोपाळ कुलकर्णी ३० - ३५ वर्षे पत्रकारितेत सक्रीय असून विविध दैनिकातील कामाचा दांडगा अनुभव आहे..डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्ह्यात नेटवर्क उभे करून जिल्हा, तालुका शाखा स्थापन करण्याच्या सूचना गोपाळ कुलकर्णी यांना देण्यात आल्या आहेत.. एस.एम देशमुख यांनी गोपाळ कुलकर्णी यांचं अभिनंदन केलं आहे...