मीच उमेदवार समजून कालिदास माने यांना मतदान करा : प्रकाश आंबेडकर
लातूर : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत असलेले उमेदवार माने कालिदास हे मीच समजून त्यांना मतदान करा व निवडून आणा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
माने कालिदास यांना कुठलाच राजकीय वारसा नाही ते शेतकरी कुटुंबातून असून जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेत माध्यमिकला शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले असल्यामुळे त्यांना शिक्षकांचे, प्राध्यापकांचे पूर्ण प्रश्न माहित आहेत. माने यांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलने उभी करून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.
वंचित व बहुजनांचे लढवय्ये नेते म्हणून कालिदास माने यांची महाराष्ट्रात ओळख आहे.लोकनेते विलासराव देशमुख यांना ते दैवत मानतात, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री बसवराज पाटील,माजी मंत्री अमित देशमुख यांना ते आदर्श मानतात तर वंचित व बहुजनांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लढणारे तसेच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कठिबद्ध असलेले प्रकाश आंबेडकर यांच्या विचाराला सलाम करणारे माने आज शिक्षकांचे प्रचलित अनुदान,जुनी पेन्शन व अनेक प्रश्नांसाठी निवडणूक रिंगणात उभे असल्याने त्यांनी आज आठही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळवला आहे. जणू आज त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्या विजयात सहभागी होण्यासाठी सर्व शिक्षक, प्राध्यापक व प्राचार्यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र आज सर्वत्र दिसत आहे. माने यांना प्रथम पसंतीचे मतदान करण्यासाठी प्रोफेसर डॉक्टर शंकर अंभोरे, प्राचार्य डॉक्टर विजय साळवे,प्राध्यापक डॉक्टर संजय शिंदे, कास्ट्राईब संघटनेचे यु. डी. गायकवाड, महाराष्ट्र विकास आघाडीचे बसवंत आप्पा उबाळे,आश्रम शाळा संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी,उर्दू संघटना, विनाअनुदान संघटना, जुने पेन्शन संघटनासह 16 शिक्षक संघटनांनी माने यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे माने यांचा विजय निश्चित दिसून येत आहे, असे शिक्षक, प्राध्यापक यांच्यात बोलले जात आहे.