Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूरच्या डॉ.प्रमोद घुगेंच्या "किडनी" उपचाराचा प्रवास थेट "सिडनी" पर्यंत......!

लातूरच्या डॉ.प्रमोद घुगेंच्या "किडनी" उपचाराचा प्रवास थेट "सिडनी" पर्यंत......!


   *लातुर--प्रतिनिधी*

लातूर येथे बार्शी रोडवरील दयानंद कॉलेज जवळ आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या ऐका दशकापेक्षा जास्त कालावधीपासून "किडनी" आजार आणि संबंधित इतर विकारांवरती डॉ.घुगे सेवा देत आहेत. त्यांनी आतापर्यंत हजारो किडनी रुग्णांना सुयोग्य उपचार देऊन बरे केले आहे. कित्येकांना तर मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून अक्षरशः जीवनदान दिले आहे. त्यांच्याकडून बरे झालेल्या काही रुग्णांचे नातेवाईक-मित्र-आप्तेष्ट महाराष्ट्रासह देशात आणि परदेशात स्थायिक असून अशापैकीच डॉ.घुगे यांच्याकडून अगदी तारुण्यात किडनीच्या आजाराने जर्जर होऊन जीवनदान मिळालेल्या रुग्णाच्या एका नातेवाईकास परदेशात हाच किडनीचा आजार शेवटच्या टोकाला घेऊन गेला. आणि मग त्या निमित्ताने घडून आलेल्या चर्चेत जेव्हा दोन्ही रुग्णांनी त्रास-निदान व उपचाराविषयी मोबाईलवरती चर्चा केली. तेंव्हा ऑस्ट्रेलिया येथील डॉक्टरांची उपचार शैली आणि महाराष्ट्रातील डॉ.प्रमोद घुगे यांचे उपचार शैलीसह किडनी आजारातील सखोल ज्ञान यातील तफावतीवर जेंव्हा सविस्तर चर्चा होते. तेंव्हा बऱ्या झालेल्या रुग्णांनी केलेले कौतुक एकवेळा समजून घेता येईल. परंतु डॉ. घुगेंची उपचार पद्धती ऐकून जेव्हा प्रदेशातील हातबल झालेला रुग्ण अगदी मृत्यूच्या दाढत असताना म्हणतो की, मी लाखो रुपये खर्च करून आज शेवटच्या घटका मोजतोय आणि तू मात्र माझ्या तुलनेत झेपल तेवढ्या खर्चात उपचार घेऊन आज ठणठणीत पुनर्जीवन जगतो आहेस. खरंच आज मी आपल्या गावी असतो तर......?
यावरून खरंच लातूरकर किती सुदैवी (लकी), भाग्यशाली आहेत की आपल्या भूमिपुत्राच्या *किडनी* उपचाराचा प्रवास थेट *सिडनी* पर्यंत चर्चिला जातोय..........!
         डॉ.प्रमोद घुगे हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदुर गावचे रहिवासी. शेतकरी कुटुंबात जन्म झालेले प्रमोद हे शालेय जीवनापासूनच अभ्यासात प्रचंड हुशार. परंतु आपण डॉक्टर होऊ आणि तेही एवढे नामांकित.....? याचे कधीही छोटेसे स्वप्नही त्यांना पडलेले नाही. परंतु आई-वडिलांसह वडील बंधू यांचे आग्रहाने प्रमोद यांनी वैद्यकीय क्षेत्र निवडले. कुस्तीची बालपणापासून प्रचंड आवड असलेले प्रमोद हे चांगले पहैलवानही आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवल्यावर मला कुस्तीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली "एकाग्रता" डॉक्टर होण्यासाठी खूपच मोलाची ठरल्याचे ते आजही अभिमानाने सांगतात. लहान वयापासूनच सामाजिक दायित्वाचाही वारसा सोबतीला असल्याने आजमितीला ते महाराष्ट्रातील पहिल्या पाच मधील तर मराठवाड्यातील पहिल्या पठडीतील नामांकित "किडनी रोग तज्ञ" म्हणून ओळखले जातात. हे सारे असतानाही त्यांच्या अंगी असलेला शून्य अहंकार व त्यांचा रुग्णांशी असलेला आत्मियतेचा संवाद आणि त्यांच्या एकंदरीत वर्तनातून ते वैद्यकीय सेवा देताना आपल्या सामाजिक दायित्वाला कधीच फाटा देत नाहीत हे वखागण्याजोगेच. शिवाय खोटे-नाटे बिलकुल चालत नसलेल्या डॉ. घुगे यांना प्रत्येक क्षेत्राप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील राजकारणाचा आणि अर्थकारणाचा मोठा तिटकारा असल्याचेही त्यांच्या वेळोवळीच्या संभाषणातून दिसून येते. आपला वैद्यकीय धर्म सांभाळून सेवा करताना आपली तीळमात्र चूक नसताना कुणी अन्याय करण्याचा विनाकारण प्रयत्न केला तर तशा प्रकारांना नाहक भीक घालणा-या डॉक्टर मधील पैलवान अधुनमधून जागा होतो हे अनेकांना खटकते. परंतु या आधुनिक काळात तथा कलयुगात स्व-संरक्षणही तितकेच महत्वाचे आहे. अलीकडच्या कोरोना काळापासून काही बोटावर मोजण्याईतपत समाज विद्रोही मंडळींनी त्यांना जाणीवपूर्वक लक्ष (टारगेट) करण्याचा यशस्वी प्रयत्न करून पाहिला.परंतु रुग्ण हेच माझे दैवत म्हणून सेवा देणाऱ्या डॉ.प्रमोद घुगे यांना दिसणा-या देवाच्या रूपात पाहणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी कधीच अंतर न दिल्याने आशांचा तो डावही हाणून पडल्याने कुस्तीत नावलौकिक मिळवलेल्या डॉ. घुगे यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातही मराठवाड्यातील एक प्रभावशाली नामांकित डॉक्टर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आणि ती ते टिकवून आहेत हे कौतुकास्पदच. तेंव्हा काहीजरी झाले तरी एवढा मोठा तज्ञ डॉक्टर लातूरकरांना मिळाला आहे हे त्यांचे भाग्यच म्हणावे लागेल. डॉ.घुगेही लातूर विषयी प्रचंड स्वाभिमान बाळगतात. शिवाय आलेल्या प्रत्येक रुग्णाला दैवत समजून सेवा देतात. त्यामुळे लातुरकर, रुग्णांसह तेही कौतुकास पात्र ठरतात हे मात्र निश्चित.......!!
Previous Post Next Post