Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अपघातग्रस्त रुग्णाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत उपचारासाठी आर्थिक मदत

Ads by Eonads
अपघातग्रस्त रुग्णाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत उपचारासाठी आर्थिक मदत
  ------------------------------------
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मराठवाडा सहसमन्वयक सोमनाथ जाधव यांच्या पाठपुराव्याला यश
----------------------------------------
लातूर : *अपघातग्रस्त रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत पन्नास हजार रुपयांच्या मंजुरीचे पत्र* नुकतेच बाळासाहेबांची शिवसेनाचे लातूर जिल्हा प्रमुख एड. बळवंत जाधव यांच्या कार्यालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. 
         काही दिवसापूर्वी लातूर औसा रोड ला अपघात झाला होता. या अपघातात शोभा बालाजी इंगळे वय 40 ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र, रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते उपचाराचा संपूर्ण खर्च पेलू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी *मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मराठवाडा सहसमन्वयक सोमनाथ जाधव यांच्याशी संपर्क साधून अर्ज केला होता.* जाधव यांच्या सततच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या प्रयत्नाने या रुग्णाला पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करून दिली. या निधी मंजुरीचे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख बळवंतभाऊ जाधव यांच्या कार्यालयात रुग्णास सुपूर्द केले. यावेळी अर्जुन जाधव, शहर प्रमुख दिनेश बोरा, परवेज पठाण, उपशहर प्रमुख विजयकुमार कांबळे संदीपमामा जाधव, मीनाक्षी मुंदडा ताई यांसह रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते *. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या उदात्त हेतूने कार्यरत असलेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व मंगेश चिवटे हे कायम गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असतात. त्यांच्या प्रयत्नाने आतापर्यंत हजारो रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.* 
-------------------------------------
Previous Post Next Post