विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथजी कराड यांच्या जन्मदिनानिमित्त
यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयात३ फेब्रूवारी पासून आरोग्य सुरक्षा पंधरवाडा
सर्व प्रकारच्या रुग्णांनी लाभ घ्यावा आ. रमेशअप्पा कराड यांचे आवाहन
लातूर दि.३१ - शून्यातून विश्व निर्माण करणारे हजारो विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा ध्यास घेतलेले विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथजी कराड साहेब यांच्या जन्मदिनानिमित्ताने लातूर एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात येत्या ३ ते १७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आरोग्य सुरक्षा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून याचा सर्व प्रकारच्या रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी संचालक आ. रमेशआप्पा कराड यांनी केले आहे.
एमआयटी शिक्षण समूह पुणे आणि विश्वशांती केंद्र आळंदी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथजी कराड साहेब यांचा ३ फेब्रुवारी ८२ वा जन्मदिवस असून यानिमित्ताने एमआयटी वैद्यकीय महाविद्यालय लातूर आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय लातूर यांच्या वतीने आरोग्य सुरक्षा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे असे सांगून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की या पंधरवड्यात सर्व प्रकारच्या रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत.
आरोग्य सुरक्षा पंधरवाडा निमित्ताने सर्वसामान्य शस्त्रक्रिया हाडांच्या शस्त्रक्रिया, प्रसुती सेवा व सिजर शस्त्रक्रिया, कुटुंबकल्याण, कान नाक घशावरील सामान्य शस्त्रक्रिया, छातीचे आणि त्वचेचे आजार व उपचार या सर्व पूर्णपणे मोफत असून सिटीस्कॅन, मुतखड्यावरील आणि कॅन्सर वरील शस्त्रक्रिया, मेंदू रोग तपासणी व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया, मणक्याच्या शस्त्रक्रिया, यकृत जठर तपासणी व शस्त्रक्रिया, व्यंधत्व तपासणी व उपचार, कॅन्सर पीडित रुग्णांसाठी वेदना निवारण, प्लास्टिक सर्जरी, हृदयरोग व मधुमेह उपचार, भौतिक उपचार, दुर्बिणीद्वारे विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया माफक दरात करण्यात येणार आहेत.
गेल्या ३२ वर्षापासून ग्रामीण भागातील रुग्णांना यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय अविरत सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सेवा रुग्णांना देण्यात येत असून या रुग्णालयात ५० बेड उपलब्ध आहेत. एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एमआरआय, डायलिसिस स्वतंत्र विभाग पीआयसीयु, आयसीयू, एनआयसीयु, सुसज्ज १२ ऑपरेशन थेटर्स अद्यावत प्रयोगशाळा २४ तास अपघात विभाग आणि रक्तपेढी आदी सुविधा रुग्णालयात उपलब्ध आहेत.
विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथजी कराड साहेब यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य सुरक्षा पंधरवड्याचा ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रुग्णांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन लातूर एमआयटी चे कार्यकारी संचालक आ रमेशआप्पा कराड यांच्यासह एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य एन. पी. जमादार, उपप्राचार्य बी.एस. नागोबा, शैक्षणिक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळे, प्रशासकीय संचालिका डॉ. सरिता मंत्री, मुख्य प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे, रुग्णालय अधिक्षक डॉ. चंद्रकला डावळे, रुग्णालय प्रशासकीय अधिकारी श्रीपती मुंडे यांनी केले आहे.