एम्प्रेस गार्डन मध्ये पुष्प प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
एम्प्रेस गार्डन मध्ये पुष्प प्रदर्शनास नागरिकांची अलोट गर्दी, आणखीन दोन दिवस चालणार पुष्प प्रदर्शन
पुष्प प्रदर्शनात वृक्ष, रोपे, बागसाहित्य खरेदीवर भर
स्व. भीमसेन जोशी आणि स्व. लता मंगेशकर यांचे पुष्पचित्र ठरले आकर्षण
पुणे : पुण्यातीप प्रसिध्द एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे 25 ते 29 जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या पुष्प प्रदर्शनास 26 जानेवारी सुट्टीचा आनंद घेत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रकारचे रोपे खरेदी, फुलांसोबत सेल्फी काढत पुष्प प्रदर्शनाचा आनंद लुटला.
एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे 25 ते 29 जानेवारी दरम्यान पुष्प प्रदर्शनाचे आयोजन कारण्यात आले आहे. पुष्प प्रदर्शनाच्या दुसर्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी रोजी सुट्टी असल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सुट्टीचा दिवस असल्याकारणाने पुणे शहरासोबत विविध शहरातील, राज्यातील ऐवढेच नव्हे तर परदेशातूनही काही नागरिकांनी हजेरी लावत गर्दी केली होती. कोरोनामुळे दोन वर्ष एम्प्रेस गार्डनने पुष्पप्रदर्शनाचे आयोजन केले नव्हते, दोन वर्षाच्या कालवधीनंतर पुष्पप्रदर्शन होत असल्याने पुष्प चाहत्यांनी खुप गर्दी केल्याचे यावेळी दिसले. हे प्रदर्शन आणखीन दोन दिवस चालणार आहे, म्हणजेच 29 जानेवारी पर्यंत सुरु आहे, तरी याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे करण्यात आले आहे.
प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. प्रदर्शनात कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीममधून विक्रेते येणार आहेत. यामध्ये नर्सरी, शेतीची अवजारे, खते, कुंड्या, बागकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ असे विविध स्टॉल आहेत जेथे रौपे, खत, बागकाम साहित्य खरेदी करण्यासही गर्दी दिसून आली. तसेच येथे संस्थेतर्फे काही ठिकाणी सेल्फी पांईट बनविण्यात आले होते, येथेही गर्दी पाहण्यास मिळाली. तसेचे विविध फुलांच्या पाकळ्यांनी स्व. भीमसेन जोशी आणि स्व. लता मंगेशकर यांचे पुष्पचित्र साकारण्यात आले हेाते, जे पुष्पप्रदर्शनाचे आकर्षण ठरले. हे पुष्पचित्राचे फोटो काढल्याशिवाय कोणाचे पुष्पचित्र आहे हे समजत नाही.
यावर्षी जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना, बोन्साई वृक्षांचे विविध प्रकार, विविध झाडे, वेलींनी नटलेले एम्प्रेस गार्डन पाहण्याचा आनंद पुणेकरांनी घेतला.
पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी झाले आहेत.या पुष्पप्रदर्शनाचे वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेच्या प्रतिकृती आदी गोष्टींचा समावेश असतो.
प्रदर्शनात विविध जातींच्या गुलाबांसह विविध पुष्परचनादेखील सादर करण्यात आल्या आहेत. प्रदर्शनादरम्यान बागांसाठी विविध शोभिवंत रोपांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये विविधारंगी फुल झाडांचे सादरीकरण करण्यात आले असून, विक्रीसाठी देखील उपलब्ध असून अनेक नागरीक उत्सुकतेने खरेदी करत आहेत.
पुष्प प्रदर्शनात लहान मुलांसाठी रेन डान्स, बग्गी रपेट, घोड सवारी, झोके आदी खेळणी उपलब्ध केले असून याचाही बालचमु सोबत मोठ्यांनीही आनंद लुटला.
-------