Ads by Eonads
नाराज शिक्षक मतदार यावेळी विद्यमान आमदार काळेंना विश्रांती देणार ?
लातूर : मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत यावेळी शिक्षकांचे विद्यमान लोकप्रतिनिधी विक्रम काळे यांच्या कार्यपद्धतीवर शिक्षक मतदार प्रचंड नाराज असून या नाराजीमुळे त्यांनी विक्रम काळेंना सक्तीची विश्रांती देण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातच आता आचार-संहिता भंग केल्याबद्दल तक्रार वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी प्रशासनाकडे ऑनलाईन दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी आद्याप गुन्हा दाखल झाला नाही.
शिक्षक आमदार म्हणून विक्रम काळे यांनी शिक्षकांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्याकामी दाखविलेली अनास्था पाहता ही निवडणूक त्यांना जड जाण्याचा अंदाज आधीपासूनच शिक्षक मतदार व्यक्त करत होते. त्यातच आता पवित्र असलेल्या शिक्षण क्षेत्रात प्रश्न कोण निर्माण केले या सर्व प्रश्नांची कोण सोडवणूक करू शकतो याची जाणीव शिक्षक मतदारांना झाली असून यावेळी कोणत्याही परिस्थितीत भाजपा आणि मित्र पक्षाचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांना विजयी करून बदल घडविण्याचा मतदारांनी निर्धार केला आहे तेव्हा लातूर जिल्ह्यातून किरण पाटील यांना मताधिक्य मिळावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदीप सोळुंखे यांच्या सारख्या शिक्षक - कार्यकर्त्याला डावलल्यानेही राष्ट्रवादीच्या विचारधारेत वावरणारे अनेक शिक्षक मतदार काळेंच्या उमेदवारीवर नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालमीत घडलेले सोळुंखे बंडखोरी करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने विक्रम काळे यांच्या अडचणीत आनंदी वाढ झाली आहे. . काळे यांनी शिक्षकांच्या समस्यांचे सोडा, ज्या पक्षांचे त्यांना आमदारकीच्या तीन संधी दिल्या , त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन वाढवण्यासाठीही फारसे काही केलेले नाही. त्याची नाराजीही शरद पवारांवर विश्वास ठेवून चालणाऱ्या हजारो शिक्षकांच्या मनात खदखदत आहे. ही नाराजी या निवडणुकीच्या माध्यमातून बाहेर निघण्याच्या अंदाजाने ही निवडणूक विक्रम काळे यांना खूपच कठीण जाणार आहे. त्यात भरीस भर म्हणजे शिक्षक मतदारांनी त्यांना विश्रांती द्यायची तयारी दाखवल्याने काळे यांच्या संभाव्य विजयावर भले मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. त्यानंतर आता
औरंगाबाद शिक्षक मतदार संघातील उमेदवार आ. विक्रम काळे यांच्याकडून लातूरात अचारसंहितेचा भंग..! झाल्याची बातमी संपुर्ण लातूर जिल्ह्यात वार्या सारखी पसरली आहे.
लातूरात अचारसंहितेचा भंग..!
औरंगाबाद शिक्षक मतदार संघातील उमेदवार आ. विक्रम काळे यांच्याकडून लातूरात अचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी प्रशासनाकडे ऑनलाईन दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी आद्याप गुन्हा दाखल झाला नाही.
विक्रम काळे यांच्याकडून लातूरात अचारसंहितेचा भंगऔरंगाबाद शिक्षक मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व आघाडीचे उमेदवार विक्रम वसंतराव काळे यांच्याकडून निवडणूकीचा प्रचार संपलेला असतानाही त्यांच्या प्रचाराचे मोठाले बॅनर लातूरात 28 जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत झळकतच होते. या निवडणूकीची आचार संहीता 28 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजताच संपली आहे. तरीही त्यांच्या प्रचाराचे बॅनर आद्यापही झळकतच आहेत. ही बाब आचार संहितेचा भंग करणारी आहे. त्यांच्यावर आचार संहिता भंग केल्याची तक्रार दाखल करावी अशी मागणी वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी केली आहे. जगदीश माळी यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिली. परंतू त्यांची तक्रार घेण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याने त्यांनी प्रसार माध्यम, सोशल मिडीयाच्या माध्यमातून तक्रार केली आहे. या प्रकरणी उमेदवार विक्रम काळे यांच्याशी संपर्क साधला असता. प्रचारासाठी बॅनर लावण्याचे व ते वेळेत परत काढण्याचे काम एका एजन्सीला दिले आहे. त्यांच्याकडून जेथे बॅनर लावले आहे तेथील बॅनर काढण्याचे काम केले आहे. तरीही एखाद्या ठिकाणी बॅनर राहले असले तरी ते तातडीने विना विलंब काढण्याचे सांगीतले आहे. या मतदार संघात अन्य पक्षाच्या उमेदवाराचेही कांही बॅनर झळकत आहेत. आम्ही त्याची तक्रार केली नाही. असे त्यांनी सांगीतले.एकंदरितच हि निवडणूक विक्रम काळे यांना खडतर जाणार असल्याचे चित्र दिसत आहे.