Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

वांजरखेडा येथे पानटपरी हटवण्याच्या कारणावरून तलवारीने व काठ्यांनी मारहाण परस्पराविरोधात गुन्हे दाखल

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
वांजरखेडा येथे पानटपरी हटवण्याच्या कारणावरून तलवारीने व काठ्यांनी मारहाण परस्पराविरोधात गुन्हे दाखल


शिरूर अनंतपाळ तालुक्यातील वांजरखेडा येथे पानटपरी हटवण्याच्या कारणावरून तलवारीने व काठ्यांनी मारहाण होऊन एकाच्या उजव्या हाता वर तर दुसऱ्याला काठ्यांनी जबर मारहाण झाल्याने परस्परा विरोधात शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे .
  वांजरखेडा येथील इंद्रजीत डोमसे व गोपाळ सुरवसे यांच्यात चौकातील पानटपरी हाटवण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला . यात इंद्रजीत डोमसे यांनी एकाच्या हातावर तलवारीने वार करून जखमी गोपाळ सुरवसे यांना जखमी केले तर इंद्रजीत डोमसे यांनाही सुरवसे यांच्याकडील जमावानी काठ्यांनी जबर मारहाण केले . यात गोपाळ सुरवसे यांच्यावर लातूर येथे उपचार सुरु असून डोमसे यांना उपचार करून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे . गोपाळ सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डोमसे यांच्यावर तर प्रतिक्षा डोमसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरवसे यांच्या विरोधात गुन्हा शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर तट हे करीत आहेत .
Previous Post Next Post