अजित पवारांच्या वक्तव्या विरोधात लातूरमध्ये खासदार आणि भाजपा पदाधिकऱ्यांचे आंदोलन
लातूूर- छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक नसून ते स्वराज्य रक्षक होते असे वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या विरोधात आज लातुर शहरातल्या विविध भागात निषेध आंदोलन करण्यात आले.खासदार सुधाकर शृंगारे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यानी ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्या जवळ गंजगोलाई भागात निषेध आंदोलन केले. त्यानंतर खासदार सुधाकर शृंगारे आणि भाजपा कार्यकर्त्यानी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांना योग्य त्या कार्यवाहीसाठी निवेदन दिले.---- --विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल विधान करताना छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्य रक्षक होते असे म्हंटले आहे. या वक्तव्याचा भाजपाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी आंदोलना दरम्यान करण्यात आली आहे. शहरातल्या विविध भागात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केले. खासदार सुधाकर शृंगारे यांच्या नेतृत्वाखाली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्या जवळ निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह श्री दिग्विजय काथवटे,श्री पंडित सूर्यवंशी, संजय सोनकांबळे, अंगद भोसले,adv विजय अवचारे, भरत लोंढे,बाबा गायकवाड, राजू सोनवणे,अनिल कबाडे, रमाताई कांबळे, सुमित्रा बनसोडे, प्रदीप सोनवणे,अर्चनाताई आलटे, सुधीर खिरोडकर, बालाजी गवारे,विपुल गोजमगुंडे, साधू लोणीकर, अतिष कांबळे, मिथुन सरवदे,पंकज सरवदे, आचित साबळे,किशोर सरवदे,विशाल थोरात,प्रशांत गवळी,मनोज मोहिते,लक्ष्मण गोरे,समर्थ गवळी, अतिष तारफे,अभिपामलवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद चौक येथे अध्यक्ष रवि सुडे यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्य बद्दल त्याच्या पुतळ्याला जोडे मारो, पुतळा प्रतिमा दहन असे आंदोलन करून निषेध केला, या आंदोलनाला , मंडल अध्यक्ष रवीजी सुडे, महिला मोर्चा चे सरचिटणीस घोडके ताई, मंडल महिला अध्यक्ष निर्मला ताई , ग्रामीण युवा भाजपा अध्यक्ष चेवले ज्ञानेश्वर ओबीसी सेल चे अध्यक्ष देवा गडदे , कानगुले महादू, भाजपा उपाध्यक्ष प्रमोद गुडे, मुन्ना हासमी, किशोर काळे, बडगिरे उद्धव, राजू सोनवणे, अरुण जाधव, राज कुमार गोजमगुंडे, सचिन मदने,