प्रा. किरण पाटील यांनाच विजयी करून बदल घडणार शिक्षक मतदारांचा निर्धार
लातूर जिल्ह्यातून मताधिक्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत–आ. रमेशआप्पा कराड
लातूर दि.२९- पवित्र असलेल्या शिक्षण क्षेत्रात प्रश्न कोण निर्माण केले या सर्व प्रश्नांची कोण सोडवणूक करू शकतो याची जाणीव शिक्षक मतदारांना झाली असून यावेळी कोणत्याही परिस्थितीत भाजपा आणि मित्र पक्षाचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांना विजयी करून बदल घडविण्याचा मतदारांनी निर्धार केला आहे तेव्हा लातूर जिल्ह्यातून किरण पाटील यांना मताधिक्य मिळावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी केले आहे.
शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असता निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आणि शिक्षण क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींची बैठक भाजपाच्या संवाद कार्यालयात झाली त्यावेळी आ. कराड बोलत होते. या बैठकीत बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाई (आ), शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्या प्रचाराची नियोजनबद्ध यंत्रणा गेल्या काही दिवसापासून काम करत आहे. भाजपाचे लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. लातूर शहरात आणि जिल्ह्यात अनेक शिक्षण संस्थांना, शाळा कॉलेजला उमेदवार किरण पाटील यांनी भेटी दिल्या, मतदाराची हितगुज केले, चर्चा केली आणि सत्य परिस्थिती समोर मांडली. शिक्षकाचे प्रश्न कोण निर्माण केले या सर्व प्रश्नांची सोडवणूक एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणीस यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते याची जाणीव मतदारांना झाली आहे.
जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, पंधरा वर्षात कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. आमदारांनी गोड बोलण्या पुढे काही केले नाही त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीत बदल करण्याचा निर्धार शिक्षक मतदारांनी केला आहे. तेव्हा प्रा. किरण पाटील यांना पहिल्या पसंतीचे मत अधिकाधिक मिळावे आणि लातूर जिल्ह्यातून मताधिक्य कशा पद्धतीने मिळेल यासाठी प्रत्येक मतदारांना प्रत्यक्ष भेटून संपर्कात राहून सर्वांनी जिद्दीने प्रयत्न करावेत मेहनत घ्यावी असे बोलून दाखवले.
शिक्षण क्षेत्राविषयी सकारात्मक विचार करणारे राज्यात आणि देशात भाजपाचे सरकार असल्याने शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि न्याय हक्कासाठी शिक्षण क्षेत्राला मान सन्मान मिळवून देण्यासाठी प्रा. किरण पाटील यांनाच विजय करणे गरजेचे आहे असे आवाहन आ. रमेशआप्पा कराड यांनी केले. यावेळी जिल्हाभरातील प्रमुख. पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.