इयत्ता नववीच्या वर्गात शिकणा-या १४ वर्षाच्या विद्यार्थीनीने केली आत्महत्या
लातूर : प्रतिनिधी इयत्ता नववीच्या वर्गात शिकणा-या १४ वर्षाच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. १७ जानेवारी रोजी सायंकाळी घडली असुन याबाबत आत्तापर्यंत कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
लातूर येथील किडस् इन्फोपार्कमध्ये श्रावणी संजय नाईकनवरे ही विद्यार्थीनी इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शाळेतील शिक्षक राहूल पवार याने श्रावणीस कॉपीड गर्ल म्हणून वर्गात चिडवले. त्यामुळे श्रावणी मानसिकदृष्ट्या खचली.त्याचा मानसिकतेतून तीने औसा रोडवरील दत्त मंदीर जवळील इंजिनिअरिंग कॉलनीतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत श्रावणीची आई वर्षा संजय नाईकनवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक दयानंद पाटील करीत आहेत.