Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

येरोळ येथे चोऱ्यांसोबत दारू विक्रीचे प्रमाणही वाढले..! याकडे पोलीसांचे दुर्लक्ष

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
येरोळ येथे चोऱ्यांसोबत दारू विक्रीचे प्रमाणही वाढले..! याकडे पोलीसांचे दुर्लक्ष


शिरूर अनंतपाळ/उदगीर
बाबूराव बोरोळे

येरोळ येथील संगमेश्वर हावगीराव साकोळकर यांच्या घरावर रविवारीच्या रात्री चोरट्यानी डल्ला मारत अंदाजे पाच तोळे सोने व रोख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केले आहे.
येथील हाॅटेल व्यावसायिक तथा शेतकरी संगमेश्वर साकोळकर व लहान भाऊ आप्पाराव व आई वडील झोपेत असतांना रविवारच्या राञी अंदाजे दिडच्या सुमारास घराच्या मुख्यभींतीवरुन चोरट्यानी घरात प्रवेश करुन संगमेश्वर व आप्पाराव या दोन मुलाच्या रुमला बाहेरून कढी लावून आई वडील झोपलेल्या रुममध्ये प्रवेश करुन लोंखडी कपाट मोडुन कपाटातील पाच ग्राम सोन्याचे मनी कि. वीस हजार रपये, पाच ग्राम सोन्याचे जोंधळी मनी कि.वीस हजार, तीन ग्राम सोन्याचे दोन मगंळसुञ कि.बारा हजार रुपये, दहा ग्राम सोन्याची बोरमाळ कि.चाळीस हजार रुपये, पाच ग्राम सोन्याचे सेवपीश कि.वीस हजार रुपये, आठ ग्राम सोन्याचे झुमके कि. बत्तीस हजार रुपये, पाच ग्राम सोन्याचे सरपाळे कि. वीस हजार रुपये, पाच ग्राम ठशाची सोन्याची अंगटी कि.वीस हजार रुपये, पाच ग्राम प्लेन सोन्याची अंगटी कि.वीस हजारासह रोख दहा हजार रुपये मिळुन दोन लाख चौदा हजार रुपयाची चोरी झाल्याची फिर्याद संगमेश्वर हावगीराव साकोळकर यांनी शिरूरआनंतपाळ पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. 
पोलीसानी घठणास्थळला भेट दिली असुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीमुळे गावात नागरिकामध्ये भीती पसरली असुन शिरूरआनंतपाळ पोलीसाची दहशत चोराना नसल्याने नागरिक संत्पत झाले आहेत.तर अनेक ठिकाणी अवैध धंदे वाढले आहेत.तर येरोळमोड येथे विनापरवाना बेकियदेशिररित्या चोरट्या मार्गाने दारु विक्री होत असून याकडे मात्र पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याने या ठिकाणी अनेकांचा अपघात होत आहेत.याबाबत वरिष्ठांनी वेळीच लक्ष घालून कार्यवाही करने अवश्यक बनले आहे
Previous Post Next Post