गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर मध्ये वैद्यकीय महाविद्याल्यातील वसतीगृहात राहणा-या एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थीनीची आत्महत्या
लातूर : प्रतिनिधी
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्याल्यातील वसतीगृहात राहणा-या एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थीनीने दि. १७ जानेवारी रोजी दुपारी खोली क्रमांक १२० मधील छताच्या पंख्यास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
औरंगाबाद येथील साक्षी गायकवाड ही विद्यार्थीनी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. ही विद्यार्थीनी महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहात होती. मंगळवारी दुपारी या विद्यार्थीनीने वसतीगृहातील १२० क्रमांकाच्या खोलीतील छताच्या पंख्यास गळफास लावून आत्महत्या केली. या विद्यार्थीनीची उद्यापासून परीक्षा सुरु होणार होती अशी माहिती आहे. या विद्यार्थीनीने आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पोलिस तपास करीत आहेत