Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आ. रमेशआप्पा कराड मुरुड येथील जि.प. शाळेत मोदीजींच्‍या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी

आ. रमेशआप्पा कराड मुरुड येथील जि.प. शाळेत मोदीजींच्‍या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी



         लातूर दि.२७- - येणारा काळ विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा असून देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशभरातील विद्यार्थ्यांसमवेत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुरुड येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाइन कार्यक्रमात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड सहभागी झाले होते.

        मुरुड येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास आ. रमेशआप्पा कराड यांच्यासह भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, मुरुड येथील सरपंच अमृता नाडे, उपसरपंच हनुमंत बापू नागटिळक, ग्रामपंचायत सदस्य वैभव सापसोड, आनंत कणसे, लता भोसले, महेश काणसे लातूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही. एस. म्हेत्रे, केंद्रप्रमुख लता पांचाळ, साधन व्यक्ती तुकाराम पवार, विविध शाळेचे मुख्याध्यापक आदीसह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास विविध शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

          देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब म्हणाले की, विद्यार्थ्यांनी दबावात न राहता इतरांच्या अपेक्षेकडे लक्ष न देता निश्चित ठरवलेले ध्येय साध्य करावे. आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करावेत आयुष्यात वेळेला महत्त्व असून याबाबत प्रत्येकाने जागृत असले पाहिजे. काम केल्याने थकवा येत नाही तर उत्साह वाढतो त्यामुळे आळशी न राहता सतत अभ्यासात, कामात कार्यरत असावे.

         निश्चितपणे आवडत्‍या विषयाला वेळ जरूर द्या मात्र कमी आवडत्या आणि अवघड विषयाला फ्रेश मूडमध्ये वेळ देऊन अभ्यास केला तर निश्चितपणे अवघड विषय ही सोपे झाल्याशिवाय राहत नाहीत, असे सांगून नरेंद्रजी मोदी साहेब म्हणाले की, आपकी मेहनत जिंदगी मे रंग लायेगी अशा शब्दात विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष देऊन मेहनत घेण्याचे आवाहन केले. शॉर्टकटचा अवलंब कधीच करू नये आजची छोटी चोरी (कॉपी) भविष्यात मोठा धोका निर्माण करू शकते असेही त्यांनी बोलून दाखविले. अनेक प्रचलित आणि दैनंदिन जीवनात येणाऱ्या विविध अनुभवाचे उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांनी जागृतपणे परीक्षेवर लक्ष द्यावे आणि यशवंत व्हावे किर्तीवंत व्हावे असे आवाहन केले.

         यावेळी मुरुड येथील सुरत सुरवसे, मेघराज अंधारे, श्रुती अविनाश सवई, फुलाबाई ईटकर, सूर्यकांत गाडे, मुन्ना पवार, शालुबाई चव्हाण यांच्यासह महिला आघाडीच्या अध्यक्षा उषा शिंदे, गणेश चव्हाण, वैजनाथ हराळे, सचिन घोडके, रवी माकूरे, योगेश पुदाले, रवीआबा नाडे, राजाभाऊ नाडे, हनुमंत पाटील, कल्याण पठाडे, प्रवीण पाटील, संतोष काळे, विशाल कणसे, सायना खान, शरद मस्के त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेसह जनता विद्यालय संभाजी कॉलेज मधील विद्यार्थी, मुख्याध्यापक छाया कांबळे, रविंद्र पटाडे, मगर मॅडम, अरुण पाटील, ऋभनाथ चौभारकर यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post