लिंगायत महामोर्चात लातूर जिल्ह्यातील हजारो समाजबांधव सहभागी होणार...
लातूर : अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने येत्या २९ जानेवारी रोजी मुंबई येथे आयोजित राज्यव्यापी महामोर्चात लातूर जिल्ह्यातील हजारो समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती बसव ब्रिगेडचे लातूर जिल्हा सचिव काशिनाथ बळवंते यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची संविधनिक मान्यता द्यावी या प्रमुख मागणीसासह म. बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, मंगळवेढा येथे म. बसवेश्वर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरू करा तसेच विधानभवन परिसरात म. बसवेश्वरांचा अश्वरुढ पुतळा उभा करावा अशा विविध मागण्यांसाठी २९ जानेवारी २०२३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी लिंगायत महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चात लाखोंच्या संख्येने लिंगायत समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Ads by Eonads