Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

महाबॅंकेतील कर्मचारी दिनांक १६ जानेवारी रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर!

महाबॅंकेतील कर्मचारी दिनांक १६ जानेवारी रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर!

व्यवस्थापनाविरोधात संघर्ष अटळ ; संप यशस्वी करा.
- कॉ. धनंजय कुळकर्णी


लातूर दि. 15 - महाबँक व्यवस्थापनाने गेल्या पाच दशकांपासून संघटनेकडे बॅंकेच्या इमारतीत असलेल्या पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर येथील कार्यालयातून संघटनेला जबरदस्तीने बाहेर काढले आहे. एआयबीईए ही संघटना महाबँकेत मान्यता प्राप्त, बहुमतातील संघटना म्हणून गेल्या साठ वर्षांपासून काम करते व त्याचाच एक भाग म्हणून संघटनेला बॅंक व्यवस्थापनांनी इतर सर्व बॅंकांप्रमाणे ही कार्यालये दिली होती पण संघटना रचनात्मक टीकेचा भाग म्हणून व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांवर टिका करते ती विद्यमान व्यवस्थापनाने वैयक्तिक घेउन हेतुत: हे पाऊल उचलले आहे ज्याच्या निषेधात महाबॅंकेतील मराठवाडा, वीर्दभ, पुणे, अहमदनगर, मुंबई, सोलापूर येथील शाखा-कार्यालयातील एआयबीईएचे सभासद दिनांक १६ जानेवारी रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जात आहेत. संपाच्या दिवशी सर्व सभासद आपापल्या शाखा-कार्यालयासमोर नीर्दशने निदर्शने करतील. बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाविरोधात संघर्ष अटळ आहे म्हणून १६ जानेवारीचा संप यशस्वी करा असे आवाहन बँक कर्मचार्यांचे नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यानी केले.

संघटना बॅंक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करते तसेच बॅंकेचे ठेवीदार, ग्राहक यांच्या रक्षणासाठी देखील सतत काम करत आली आहे. बॅंकेने जेव्हा चूकीची कर्ज मंजूर केली तेंव्हा संघटनेने whistle blower चे काम करुन त्याला अटकाव घालायचा प्रयत्न केला म्हणूनच किंग फिशरच्या डॉ विजय मल्या यांच्या तावडीतून हि बॅंक वाचू शकली. संघटनेचा एक प्रतिनिधी बॅंकेच्या संचालक मंडळावर नेमला जातो तो गेली सहा वर्षांपासून नेमला गेलेला नाही ज्यामुळे बॅंक व्यवस्थापन आपल्या हातातील अनिर्बंध सत्तेचा वापर करत कर्मचारी आणि संघटना यांच्या बाबत मनमानी निर्णय घेत आहे ज्यामुळे वीसंवादाचा सूरच उमटू नयेत. बॅंक व्यवस्थापनाच्या या सुडबुद्धिच्या धोरणांच्या विरोधात दिनांक १६ जानेवारीचा हा संप आहे ज्यात महाबॅंकेतील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे एआयबीईए संघटनेतर्फे आवाहन करण्यात येत आहे. संप काळात संघटनेच्या कृतिकार्यक्रमात सहभागी होऊन बँकेच्या या आढ़मुठे धोरणा विरोधातील आंदोलन यशस्वी करा असे आवाहन कर्मचाऱ्यांचे नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी केले.

Previous Post Next Post