गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
वडिलांनी अपार्टमेंट बांधलेली जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे मुलांनी परस्पर नावावर करुन केली फसवणूक
चार मुलांसह, तलाठी, मुद्रांक विक्रेता, साक्षीदार अशा १० जणांविरोधात गुन्हा दाखल
लातूर :लातूर शहरामध्ये दिवसेंदिवस फसवणूकीचे प्रकार वाढत चालले आहेत त्यामध्येच आता वडिलांनी अपार्टमेंट बांधलेली जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे मुलांनी परस्पर नावावर करुन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वडिलांनी दिलेल्या तक्रारिवरुन चार मुलांसह, तलाठी, मुद्रांक विक्रेता, साक्षीदार अशा १० जणांविरोधात गांधी चौक पोलिसांत फसवणुकिचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
या संदर्भात अधिक माहिती अशी की, शहरातील गवळी नगर, गांधी चौक येथे बाबु फुलारी, गौस बाबु फुलारी, साक्षीदारांसह तर, मुळ व्यक्ती समोर नसतानाही वास्तव्यास असलेले रुकमोदीन उर्फ बाबुमिया इब्राहिमसाहब फुलारी सय्यद (वय १०) यांना पाच मुले आणि सात मुली असून ते वरील ठिकाणी पत्नीसह वास्तव्यास आहेत. सन १९९४ साली त्यांनी सुमारे पावणेदोन एकर जागा शहरापासुन जवळच घेतली होती
त्यानंतर एका गुत्तेदारामार्फत त्यांनी खोटे बाँड तयार केले. या जागेवर १४ फ्लॅट असलेले अपार्टमेंट बांधले. जेंव्हा जागा मुद्रांक विक्रेता, महावीर हिरालाल मांडवकर यांनी विक्रीचा विषय आला तेंव्हा नयुब शमशोद्दीन बाबुमियाँ फुलारी आणि शहावलीयोद्दीन शहरुकमोद्दीन साक्षीदार म्हणून स्वाक्षऱ्या केल्या. . तर तलाठी उर्फ बाबु फुलारी (सर्व रा.इंडीयानगर, लातूर )या चार मुलांनी संगणमत करून सदर जागा बक्षीसपत्र करुन घेण्यासाठी एस पी स्वामी यांच्याकडून खोटे बाॅंड तयार केले त्यावर तब्रेजोद्दीन गौसोद्दीन फुलारी व महावीर हिरालाल मांडवकर यांनी साक्षीदार म्हणुन स्वाक्षर्या केल्या तर मुळ व्यक्ति समोर नसतानाही पंजाबराब बब्रुवान सितापुरे यांनी नोटरी करुन दिली तर तलाठी कार्यालयातील कोतवाल आणि संबंधीत तलाठ्याने या जमीनीचा फेरफार केला.हा प्रकार लक्षात येताच रुकमोदीन उर्फ बाबुमिया इब्राहिमसाहब फुलारी सय्यद यांनी गांधी चौक पोलिसांत तक्रार दाखल केली. परंतु त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर त्यांनी पोलीस उपाधिक्षक कार्यालय आणि पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली. परंतु त्यांनीही या तक्रारीवर कार्यवाही केली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तपासल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशाने गांधी चौक पोलिसांत वरील १० जणांविरोधात गांधीचौक पोलिसांत गुरनं ५१५ / २२ गुरनं ४०६, ४१७, ४२०, ४२७, ४६८, ४६५ ४६७, ४६८, ४७१, १२० बी, ३४ भादंवि अन्वये गुन्हा