गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
२२ कोटींच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी मनोज फुलबोयने सह दोघांना ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
![]() |
मुख्य आरोपी- मनोज फुलबोयने |
लातूर :लातूर जिल्हाधीकार्यालयामध्ये एका सामान्य कारकुनाने 22कोटीचा अपाहार केल्याने लातूरमध्येच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली असून तहसिलदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन २३ कोटी ६२ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य आरोपीसह दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आश्चर्यजनक आणि धक्कादायक असा हा प्रकार सात वर्षानंतर उघडकीस आला असुन या काळात तब्बल 10 तहसीलदार आणि दोन जिल्हाधिकारी यांचा कार्यकाल झाला असुन सध्याचे नुतन जिल्हाधीकारी यांनाही दोन वर्ष हा प्रकार समजला नाही याबाबत संपुर्ण लातूर जिल्ह्यात एकच चर्चा होवू लागली आहे.यामध्ये आता आरोपी ची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये तहसिलदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन २२ कोटी ६२ लाख रुपयांचा अपहार केल्याचे समोर आल्यानंतर मुख्य आरोपी मनोज नागनाथ फुलबोयने याच्यासह चंद्रकात नारायण गोंगडे या दोघांना अटक करण्यात आलेली होती. या दोघांनाही न्यायालसमोर उभे केले असता त्यांना न्यायालयाने ३० जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी कोठडी सुनावल्याचे एमआयडीसी पोलीस पोलीस निरिक्षक संजीवन मिरकले यांनी सांगीतले