एक्झाम वारीयर्स" विद्यार्थी पालकांसाठी कानमंत्र ठरेल-खासदार सुधाकर शृंगारे
खासदारर सुधाकर शृंगारे यांचा "परीक्षा पे चर्चा" उपक्रमात सहभाग।
---(लातुर-प्रतिनिधी)--- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील नव युवकांना समर्पित केलेले "एक्झाम वारियर्स" हे पुस्तक देशातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना नवा कानमंत्र देणारे ठरणार आहे,परीक्षेचा तणाव बाजूला सारून परीक्षेला कोणत्या पद्धतीने सामोरे जायला पाहिजे यासंदर्भातील 34 मंत्र नरेंद्र मोदी यांनी या पुस्तकात दिले आहेत. हे मंत्र देशातील विद्यार्थी आणि पालकांसाठी कानमंत्र ठरतील असा विश्वास खासदार सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केला आहे.ते लातुर शहरातल्या ज्ञानेश्वर विद्यालयात "परीक्षा पे चर्चा" उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील विद्यार्थ्यांना उद्देशून केलेली परीक्षा पे चर्चा खासदार सुधाकर शृंगारे यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून ऐकली
.--- खासदार सुधाकर शृंगारे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना "एक्झाम वारियर्स" हे पुस्तकही वितरित करण्यात आले. परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी कोणत्या पद्धतीने तयारी करावी, पालकांनी आपल्या मुलांची परीक्षेसाठी कशी तयारी करून घ्यावी. त्याच बरोबर मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक सदृढतेसाठी करावयाची योगासने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.एक्झाम वारीयर्स या पुस्तकात नरेंद्र मोदी यांनी परीक्षे संदर्भांतील सूक्ष्म निरिक्षणे नोंदवली आहेत, सहजतेने परीक्षेची तयारी सांगताना यश संपादन करण्याचा सहज मार्गही सांगितला आहे,त्यामुळे एक्झाम वारीयर्स हे पुस्तक विद्यार्थ्यांना कानमंत्र देणारे ठरेल असा विश्वास खासदार सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केला आहे. खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एक्झाम वारियर्स हे पुस्तक वितरित करण्यात येत आहे.
-- ज्ञानेश्वर विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या याकार्यक्रमात खासदारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत एक्झाम वारियर्स पुस्तकाचे महत्व पटवून दिले.
---यावेळी खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह, युवा मोर्चाचे पदाधिकारी अजित पाटील कव्हेकर, माजी नगरसेवक अजय दुडिले, adv गणेश गोजमगुंडे, संजय सोनकांबळे,अतिष कांबळे,शैलेश भडिकर, प्राचार्य श्री वाघमारे सोपान, उपप्राचार्य पेद्देवाड ,पर्यवेक्षक संजय मलवाडे , प्राध्यापक विश्वनाथ खंदाडे व इतर शिक्षक-शिक्षिकासह विद्यार्थी उपस्थित होते