गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
01लाख 42 हजार रुपयाचा 5.4 Kg. गांजा व एक तलवार जप्त
पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांची कार्यवाही
3 व्यक्ती विरोधात 2 गुन्हे दाखल
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस उपविभाग चाकूर व अहमदपूर अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर व अहमदपूर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांनी उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन केले असून त्यांचे मार्फत उपविभागातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
दरम्यान पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पथकाने चाकूर तालुक्यातील शहीद नगर, नळेगाव येथील एका घरात व अहमदपूर तालुक्यातील समता नगर, शिरूर ताजबंद येथील घरात छापा टाकून गांजाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी घरात लपून ठेवलेले अनुक्रमे 1.310 किलोग्राम व 4.94 किलोग्राम प्रतिबंधित बी मिश्रित गांजा, लोखंडी तलवार, मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे.
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील समता नगर घरात टाकलेल्या छाप्यात प्रतिबंधित गांजासह एक लोखंडी तलवार आढळून आल्याने ती जप्त करण्यात आली असून पोलीस ठाणे अहमदपूर येथे गुन्ह्यातील आरोपी नामे
1) बाबुराव कलाप्पा चौगुले, राहणार समता नगर, शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर
2) सोबत एक महिला
यांचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 74/2023 कलम 20 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS act ) 1985 सह कलम 4, 25 (1ख) शस्त्र अधिनियम 1959, सह कलम 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून चोरटी विक्री व्यवसायासाठी साठवून ठेवलेला बी मिश्रित गांजा, एक मोटर सायकल व एक लोखंडी तलवार असा एकूण 93 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच चाकूर येथे केलेल्या कार्यवाहीत आरोपी नामे
1) सलीम वलीसाब मुजावर, वय 41 वर्ष, राहणार शहीद नगर, नळेगाव. तालुका चाकूर.
याचे विरुद्ध पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 53/ 2023 कलम 20 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS act )1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून 4.94 किलोग्रॅम वजनाचा चोरटी विक्री व्यवसाय करिता साठवून ठेवलेला बी मिश्रित गांजा किंमत अंदाजे 49 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.
वर नमूद दोन गुन्ह्यात आरोपीताकडून 5.4 किलोग्रॅम वजनाचा प्रतिबंधित गांजा ज्याची किंमत अंदाजे 1 लाख 42 हजार 500 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी/ अंमलदार करीत आहेत.
पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 11/02/2023 रोजी अहमदपूर व चाकूर तालुक्यात दिवसभर चाललेल्या कारवाईत पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर व अहमदपूर चे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस अंमलदार गंगाधर शिंगाडे चिलकोटे पद्माकर , सुरज शेख, सुनील श्रीरामे, विष्णू मामाडगे, सूर्यकांत कलमे, बाळासाहेब घाडगे, सचिन कांबळे, महिला पोलीस अमलदार श्रीमंगले, सीमा सुरवसे यांनी सदरची कामगिरी केली आहे.