Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

हातभट्टी दारू तयार करणाऱ्यां ठिकाणावर छापा,03 लाख 01हजार 500 चा मुद्देमाल जप्त,

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
  हातभट्टी दारू तयार करणाऱ्यां ठिकाणावर छापा,03 लाख 01हजार 500 चा मुद्देमाल जप्त, 
08 गुन्हे दाखल,पोलीस ठाणे कासारशिरशी ची कारवाई.




       लातूर-       या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, निलंगा श्री.दिनेशकुमार कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कासारशिरशी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रियाज शेख यांच्या नेतृत्वाखाली कोराळवाडी येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणारे 08 इसमावर पोलीस ठाणे कासारशिरशीच्या पथकाने आज दिनांक 24/02/2023 रोजी सकाळी छापामारी केली.यामध्ये 4,700 लिटर रसायन , हातभट्टी निर्मिती करण्याचे साहित्य,हातभट्टीची दारू असा एकूण किंमत 03 लाख 01 हजार 500 रुपये चे रसायन, हातभट्टीदारू आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नाश करण्यात आले आहे.या कार्यवाहीत 

1) शिवशंकर सुभाष बुकले , राहणार कोराळवाडी

2) राम अण्णाराव दगदाडे राहणार कोराळवाडी

3) अंकुश लहू कानडे , राहणार कोराळवाडी

4) मधुकर लिंबाजी मिलगिरे , राहणार कोराळवाडी

5) दिलीप दत्तू उमापुरे , राहणार कोरडवाडी

6) बाळू व्यंकट उमापुरे , राहणार कोराळवाडी

7) लक्ष्मण तिमन्ना उमापुरे रा कोराळवाडी

8) वसंत ईरन्ना उमापुरे

                 अशा एकूण 08 आरोपीवर पो.ठाणे कासारशिरशी येथे कलम 65 (फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे एकूण 08 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

              सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे कासारशिरशी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज शेख, पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर , पोलिस अमलदार मारुती महानवर, गोरोबा घोरपडे, ज्ञानोबा शिरसाट, श्रीकांत वरवटे, गणेश सोनटक्के, विकास मुगळे, बळीराम मस्के व होमगार्ड यांनी केली आहे.
Previous Post Next Post