Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

09 लाख 91 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त. 4 व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
09 लाख 91 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त. 4 व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. 
पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांची कारवाई.


               या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम , उपविभागीय पोलिस अधिकारी, चाकूर व अहमदपूर यांनी उपविभागीय चाकूर,अहमदपूर पोलीस ठाणे चाकूर आणि अहमदपूर येथील पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून अहमदपूर पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत. 
             त्याप्रमाणे उपविभाग अहमदपूर हद्दीमधील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याकरिता अवैध धंद्याची माहिती काढत असताना पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की,अहमदपूर शहर व परिसरातील काही इसम प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री व्यवसाय करीत आहेत साठवणूक करीत आहेत.
            अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहनिशा करून सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात पोलिस अधिकारी व अमलदारांच्या पथकाने छापा मारून 4 इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे,महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटका व सुगंधित पानमसाला असा एकूण 09 लाख 91 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू जप्त करण्यात आले आहे.
 सहाय्यक आयुक्त कार्यालय, लातूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. विठ्ठल लोंढे यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे अहमदपूर येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारे इसम नामे

1) विठ्ठल गुरुलिंग हामणे, वय 46 वर्ष ,राहणार भाग्यनगर, अहमदपूर.

2) बबन बाबू पठाण, राहणार चारटांगी, अहमदपूर.

3) राजू उर्फ शिवलिंग गुरुलिंग हामने, राहणार अहमदपूर.

4) शंकर कानगुले, राहणार अहमदपूर.

                यांचे विरुद्ध पोलीस ठाणे अहमदपूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 73/ 2023, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम-59
             याप्रमाणे गुन्हा दाखल करून 09 लाख 91हजार 100 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वर नमूद आरोपीतापैकी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे
                गुन्ह्याचा पुढील तपास अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.
            सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, सहायक पोलिस अधीक्षक श्री.निकेतन कदम,यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रोकडे, पोलीस अमलदार कलमे, पुठेवाड, बाळासाहेब साळवे, बापूराव धुळगुंडे, सुदर्शन घुगे, आरदवाड, रतनदीप कांबळे यांनी पार पाडली.
Previous Post Next Post