गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
जिल्हा नियोजन अधिकार्यांचे बंद घर फोडून, 3 लाख 74 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास
लातूर शहरातील अजिंक्य सिटी येथे राहणार्या जिल्हा नियोजन अधिकारी मच्छिंद्र शंकरराव दुशिंग यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडून घरातील रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिने असा 3 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून , दिनांक 11 फेब्रुवारी रोजी ते आपल्या मुलासह संभाजीनगर येथे गेले होते. त्यामुळे घरी त्यांची पत्नी एकटीच होती. लातूरमध्ये राहणार्या त्यांच्या बहिणीच्या घरी त्या घर बंद करून गेल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडून
पाच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, तेरा ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस, पाच ग्रॅम सोन्याचे कानातले, दोन तोळ्याचे सोन्याचे लॉकेट, पाच ग्रॅम वजनाच्या चार अंगठ्या, एक तोळा सोन्याची अंगठी, चार ग्रॅम सोन्याचे ब्रेसलेट, चार तोळ्याची चांदीची चैन, चांदीचे लहान मुलांची दागिने, बाजूबंद, कमरपट्टे, वाळे, बांगड्या, दोनशे ग्रॅम वजनाचे, दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, तीन ग्रॅम वजनाचे नेकलेस, एक तोळा वजनाचे सोन्याचे दोन मिनी गंठण, तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, पाच ग्रॅम वजनाचे नागवेल, एक ग्रॅम वजनाचे लहान मुलांच्या 15 अंगठ्या, 48 हजार रोख असा ऐवज पळवण्यात आला. अज्ञात व्यक्तीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.