Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मारहाण करून मोबाईल, रोख रक्कम पळविणाऱ्या जबरीचोरी मधील आरोपींना मुद्देमालासह 3 तासात अटक.

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
 मारहाण करून मोबाईल, रोख रक्कम पळविणाऱ्या जबरीचोरी मधील आरोपींना मुद्देमालासह 3 तासात अटक.
 पोलीस ठाणे विवेकानंद ची कामगिरी....



                 या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 22/02/2023 रोजी दुपारी 1 वाजून 30 मिनिटाच्या सुमारास दोन अनोळखी आरोपींनी पोलीस ठाणे विवेकानंद हद्दीत एका कार चालकाला अडवून जबरीने त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम हिसकावून घेऊन जाण्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे विवेकानंद येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 127/2023, कलम 341,392,34 भा द वि (दुखापत करून लुटणे,लुटण्याचा प्रयत्न करणे,) या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
                पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करणे बाबत आदेशित करून सूचना केल्या होत्या. पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने फिर्यादीकडे सखोल विचारपूस करून त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील व लातूर शहरातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी करण्यात येत होती. दरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या विश्वासनीय व गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून आरोपी नामे 

1) ईश्वर गजेंद्र कांबळे, वय 21 वर्ष, राहणार जय नगर ,लातूर.

2) गोविंद रमेश शिंदे, वय 22 वर्ष,राहणार जय नगर ,लातूर.

                यांना त्याच दिवशी त्यांच्या राहत्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी मळवटी रिंगरोड ने जाणाऱ्या एका कारचालकास अडवून जबरीने त्याचे कडील मोबाईल व रोख रक्कम चोरल्याचे कबूल करून सदरचा मोबाईल व रक्कम काढून दिल्याने ती जप्त करण्यात आली असून अटक करण्यात आलेली आहे.
            गुन्ह्याचा पुढील तपास विवेकानंद चौक चे पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे हे पोलीस स्टेशन करीत आहे.
                 सदर गुन्ह्यातील आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून ईश्वर गजेंद्र कांबळे याचेवर लातूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे ला मालमत्ता चोरीचे व शरीराविषयीचे 09 गंभीर गुन्हे दाखल असून आरोपी गोविंद रमेश शिंदे यांच्यावर शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
                 सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार, पोलीस उपनिरीक्षक हाजी सय्यद, पोलीस अंमलदार मुनवरखान पठाण, दयानंद सारोळे, सुधीर साळुंखे, विनोद चलवाड, नारायण शिंदे यांनी केली आहे.
Previous Post Next Post