Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

BBC कार्यालयात IT चा सर्व्हे सलग दुसऱ्या दिवशीही सुरु

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
BBC कार्यालयात IT चा सर्व्हे  सलग दुसऱ्या दिवशीही सुरु




BBCच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात आयकर विभागाच्या (IT) पथकाचे सर्वेक्षण दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी अधिकारी 2012 पासून आतापर्यंतच्या खात्यांचा तपशील तपासत आहेत. आयटी अधिकाऱ्यांनी वित्त विभागातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल, लॅपटॉप-डेस्कटॉप जप्त केले आहेत. सर्वेक्षणादरम्यान आयटी अधिकारी आणि बीबीसी इंडियाच्या संपादकांमध्ये वादावादीही झाली आहे. एनडीटीव्हीच्या सूत्रांनुसार, संपादकांनी आयटी अधिकाऱ्यांना कोणत्याही एडिटोरियल कंटेंटचा ऍक्सेस देण्यास नकार दिला.

दुसरीकडे, बीबीसीने आपल्या कर्मचाऱ्यांना मेलद्वारे सहकार्य करण्यास सांगितले आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांनी प्रामाणिकपणे द्यावे, असे सांगण्यात आले. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीवर आंतरराष्ट्रीय करात अनियमिततेचा आरोप केला आहे. अनेक तासांपासून अधिकारी लॅपटॉप आणि कागदपत्रांची छाननी करत आहेत.

BBC चा कर्मचार्‍यांना मेल, म्हणाले- कोणतीही माहिती डिलीट करू नका, लपवू नका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीबीसी व्यवस्थापनाने बुधवारी सकाळी कर्मचाऱ्यांना मेल केले. यामध्ये कर्मचाऱ्यांना प्रत्येक प्रश्नाला प्रामाणिकपणे उत्तर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बीबीसीने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की जर आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला भेटायचे असेल तर तुम्हाला त्यांना भेटावे लागेल. बीबीसीने भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी एक हेल्पलाइनही सुरू केली आहे.

​​​​​बीबीसीची संस्थात्मक रचना, उपक्रम, संस्था आणि भारतातील काम याबाबत प्रश्न विचारणे हे तपासाच्या कक्षेत येते आणि असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, असे मेलमध्ये म्हटले आहे. त्यांना उत्तर दिले पाहिजे.
कर्मचार्‍यांना असेही सांगण्यात आले आहे की तुमचे वैयक्तिक उत्पन्न आणि आयकर बद्दलचे प्रश्न सर्वेक्षणाच्या कक्षेबाहेर आहेत आणि तुम्ही त्यांची उत्तरे देण्यास नकार देऊ शकता.
तुमच्या संगणक प्रणालीतून कोणतीही माहिती हटवू नका किंवा आयकर अधिकाऱ्यांपासून लपवू नका.
अमेरिका म्हणाली- भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क करा
यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते नेड प्राइस यांना विचारण्यात आले की बीबीसीवरील कारवाई लोकशाहीच्या काही मूल्यांच्या विरोधात आहे का? ते म्हणाले, ‘बीबीसीच्या कार्यालयात आयकर विभागाचे छापे पडल्याची माहिती आम्हाला आहे. आम्ही जगभरातील प्रेस स्वातंत्र्याचे समर्थन करतो. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. यामुळे अमेरिका, भारतासह संपूर्ण जगात लोकशाही मजबूत होते.

तथापि, बीबीसीमध्ये रेडबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते म्हणाले – आम्हाला त्यातील तथ्य माहित आहे, परंतु सध्या त्याबद्दल काहीही सांगू शकत नाही. यासंबंधी माहितीसाठी तुम्ही भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

दिल्ली कार्यालयात 24 आयटी अधिकारी उपस्थित
आयकर विभागाच्या (IT) टीमने मंगळवारी सकाळी 11 वाजता बीबीसी इंडियाच्या कार्यालयात सर्वेक्षण सुरू केले. बीबीसीचे कार्यालय दिल्लीतील केजी मार्ग भागात एचटी टॉवरच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर आहे. येथे 24 आयटी सदस्यांच्या पथकाने छापा टाकला. मुंबईतील सांताक्रूझ भागातील बीबीसी स्टुडिओमध्येही सर्व्हे सुरू आहे.

मुंबईतील सांताक्रूझ भागात बीबीसीचे ब्युरो ऑफिस या इमारतीत आहे. आयटीचे छापे येथे सुरूच आहेत.
मुंबईतील सांताक्रूझ भागात बीबीसीचे ब्युरो ऑफिस या इमारतीत आहे. आयटीचे छापे येथे सुरूच आहेत.
काँग्रेसची टीका – अघोषित आणीबाणी
काँग्रेसने BBCच्या कार्यालयांवरील कारवाईचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील डॉक्यूमेंट्रीशी जोडला आहे. काँग्रेसने एका ट्विटद्वारे ही अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप केला आहे. पक्ष एका ट्विटद्वारे म्हणाला – प्रथम BBCची डॉक्यूमेंट्री आली. तिच्यावर बंदी घालण्यात आली. आता BBCवर ITची छापेमारी झाली आहे. अघोषित आणीबाणी.
BBC वर्ल्ड सर्व्हिस अंतर्गत चालते दिल्ली कार्यालय


ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) वर्ल्ड सर्व्हिस टेलिव्हिजन ब्रिटिश सरकारची संस्था आहे. ती 40 भाषांमध्ये बातम्यांचे प्रसारण करते. ब्रिटीश संसदेने मंजूर केलेल्या अनुदानावर ती चालते. त्याचे व्यवस्थापन परराष्ट्र व राष्ट्रकुल कार्यालयामार्फत केले जाते. बीबीसीचे कामकाज डिजिटल, संस्कृती, मीडिया व क्रीडा विभागांतर्गत चालते. बीबीसीची सुरुवात 1927 साली रॉयल चार्टर अंतर्गत झाली.
Previous Post Next Post