गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
विहिरीत पाय घसरुन पडल्याने देवणी येथील दोन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..
हंचनाळ शिवारातील घटना
देवणी पोलीस ठाण्यात आक्समिक मृत्यूची नोंद..
बाबूराव बोरोळे
उदगीर/शिरूर अनंतपाळ/देवणी प्रतिनिधी----
देवणी शहरालगत असलेल्या हंचनाळ शेत शिवारात शौचास गेलेल्या दोन चुलत भावांचा पाणी घेण्यासाठी विहिरीवर गेल्यावर तोल जावून विहिरीतील पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात आक्समिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत देवणी पोलीसांच्या वतीने मिळालेली अधिक माहिती अशी की,
देवणी येथील घिसाडी समाजाचे तरुण नरसिंग युवराज चव्हाण वय २० वर्षे व त्याचा चुलत भाऊ संगमेश्वर संजय चव्हाण वय १८ वर्षे दोघेही राहणार देवणी हे शुक्रवारी सकाळी दररोज प्रमाणे शौचास हंचनाळ शेत शिवारात गेले होते. ते बराच वेळ घराकडे परत आले नसल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ते हंचनाळ शिवारातील रमेश रावण बिरादार यांच्या विहिरीत पाणी घेण्यासाठी जावून पाय घसरुन दोघेही पाण्यामध्ये पडून मरण पावले आहे. अशी खबर मयताचा भाऊ अंकुश युवराज चव्हाण राहणार देवणी यांनी दिल्यावरुन देवणी पोलीस ठाण्यात आक्समिक मृत्यू नंबर २ / २०२३ कलम १७४ सी. आर. पी. सी. प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल नरेश उस्तुर्गे हे करीत आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.