Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

‘एचआयव्ही’ग्रस्त अनाथ मुलांसाठी काम करणार्या सेवालयाचे रवि बापटलेंसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
 ‘एचआयव्ही’ग्रस्त अनाथ मुलांसाठी काम करणार्या सेवालयाचे रवि बापटलेंसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल



औसा : औसा न्यायालयाने १५६ (३) प्रमाणे पोलिसांना न केल्याने १० फेब्रुवारी २०२३ शुक्रवारी रात्री औसा पोलिस ठाण्यात सेवालयाचे रवी बापटले व अन्य ८ जणाविरुध्द जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने लातूर जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीवरून रवी बापटले हे   ‘एचआयव्ही’ग्रस्त अनाथ मुलांसाठी काम करतात.ते कौन बनेगा करोड़पति मराठी मध्येही त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले होते त्यानंतर आता या घटनेने एकच खळबळ उडाली आहे .औसा तालुक्यातील हासेगाव येथील  सेवालयाचे प्रमुख रवी बापटले यांनी सेवालया शेजारी असलेली  शेती ताब्यात घेण्यासाठी दबाव निर्माण करत जमिनीच्या वादातून फिर्यादीसह परिवारातील सदस्यांना रस्त्यात अडवून आरोपी रवि बापटलेंसह इतरांनी कत्ती, रॉड, काठी, दगडाने जबर मारहाण करुन गंभीर दुखापत केली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच फिर्यादीच्या गाडीवर डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करीत हातातील सोन्याचे ब्रासलेट हिसकावून घेतले. या प्रकरणी औसा न्यायालयाने १५६ (३) प्रमाणे पोलिसांना निर्देशित केल्याने १० फेब्रुवारी २०२३ शुक्रवारी रात्री औसा पोलिस ठाण्यात सेवालयाचे रवी बापटले व अन्य ८ जणाविरुध्द जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत
Previous Post Next Post