Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातुर विमानतळावरून देशाअंतर्गत विमानसेवा सुरू करा

लातुर विमानतळावरून देशाअंतर्गत विमानसेवा सुरू करा
--खासदार सुधाकर शृंगारे यांची लोकसभेत मागणी
 उड्डाण योजनेत लातुरचा समावेश करण्याची मागणी



 (लातुर-प्रतिनिधी)
  -- लातुरच्या विमानतळावरून देशातील अनेक शहरांना जोडणारी विमान सेवा सुरुवात करण्यात यावी अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी लोकसभेत केली आहे. मुंबई-लातुर-नांदेड-तिरुपती ही विमानसेवा सुरुवात करण्यास सरकारने प्राधान्य द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. सरकारच्या उड्डाण योजनेत लातुरचा समावेश करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. लातुर विमानतळावरून विमान सेवा सुरुवात करण्यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांनी प्रशासकीय पातळीवरही पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे लातुरची विमानसेवा लवकरच सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. 
--- लोकसभेत बोलताना खासदार सुधाकर शृंगारे यानी म्हंटले आहे की, वर्ष-2008 मध्ये लातुर विमानतळाची निर्मिती झाली त्या नंतर काही वर्षांनी लातुर विमानतळावरून किंगफिशर एअरलाइन्सने विमान सेवा सुरुवात केली होती.मुंबई,लातुर, नांदेड अशी ही विमानसेवा होती. ही विमानसेवा काही काळ सुरू राहिल्या नंतर तांत्रिक अडचणीमुळे बंद करण्यात आली , त्यानंतर गेली अनेक वर्षे विमानसेवा बंद आहे. लातुर विमानतळावरून दोन इंजिन असलेल्या विमानांना उड्डाण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मराठवाडा रेल्वे कोच कारखाना लवकरच सुरुवात होणार असल्याने विमान सेवेला देखील त्यामुळे प्रवासी मिळण्यास मदत होणार आहे. लातुरचे शैक्षणिक,औद्योगिक आणि व्यापारी दृष्ट्या महत्व लक्षात घेऊन विमान सेवा सुरुवात करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी असल्याचेही खासदार सुधाकर शृंगारे यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. लातुर विमानतळावरून देशा अंतर्गत विमान सेवा सुरुवात करावी त्यासाठी सरकारने प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबई-लातुर-नांदेड-तिरुपती या विमानसेवेला जास्तीत जास्त प्रवासी मिळू शकतात त्यामुळे ही सेवा सुरुवात करावी अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी केली आहे. विमानसेवा सुरुवात करण्या बरोबरच खासदार सुधाकर शृंगारे यांनी लातुरला पायलट प्रशिक्षण केंद्र व्हावे यासाठीही प्रयत्न चालवले आहेत. खासदार सुधाकर शृंगारे यांची मागणी लक्षात घेऊन लातुरवरून विमानसेवा सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. रेल्वे बरोबरच लातुर हवाई सेवेशी जोडले जावे अशी लातुरकरांची मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन खासदार सुधाकर शृंगारे यांनी हा विषय लोकसभेत मांडला आहे.
Previous Post Next Post