Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

साहेब...फंड देवू नका; अधिकारी गायब करण्याच्या मानसीकतेत..!

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा
साहेब...फंड देवू नका; अधिकारी गायब करण्याच्या मानसीकतेत..!
उद्घाटन कार्यक्रमास शहरातील १७ शाळांनी प्रत्येकी ५०० विद्यार्थी उपस्थित ठेवण्याचे आदेशामुळे शिक्षकही नाराज










लातूर-छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे अत्यंत उत्साही वातावरणात खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते ध्वज फडकवून आणि क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून उद्घाटन करण्यात आले. राज्यातील 32 संघ 448 खेळाडू, 150 तांत्रिक समिती सदस्य सहभागी आहेत


या उद्घाटन समारोह प्रसंगी आमदार अभिमन्यु पवार यांनी पाच लाख रुपयांची मदत केली असल्याचे सांगीतले तर पुढील फंडासाठी आमदार अमित देशमुखांनी पुढाकार घ्यावा माझ्याकडे एवढाच फंड असल्याचे सांगीतले आणि एकच चर्चा होवू लागली.आमदार अमित देशमुखांनी ही आपल्या देशमुखी शैली मध्ये आपणास जेवढा काही निधी लागणार आहे तो मि देतो अशी ग्वाही दिली खरी परंतु साहेब...यांना फंड देवू नका ..कारण अधिकारी या पैशाचा उपयोग भलतीकडेच करुन गायब करण्याच्या मानसीकतेत दिसत असल्याची जोरदार चर्चा लातूर शहरामध्ये होवू लागली आहे.त्यातच आता
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेनिमित्त खेळाडूंच्या स्वागतासाठी विद्यालय, महाविद्यालयानी त्यांच्या परिसरातील मुख्य रस्त्यावर स्वागत होर्डिंग व कमानी उभारून स्पर्धेत उत्साह भरावा तसेच स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमास शहरातील १७ शाळांनी प्रत्येकी ५०० विद्यार्थी उपस्थित ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (मा.) यांनी मुख्याध्यापक, प्राचार्यांना काढल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजगी असल्याचे सांगण्यात येत आहे.
१५ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचे उद्घाटन रोजी विद्यार्थ्यांची उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी (मा.) शहरातील १७ शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांना कळविले आहे. उद्घाटन दुपारी ४ वाजता होणार असल्याने शाळा करून पुन्हा विद्यार्थ्यांना लातूर शहरात छत्रपती शिवाजी स्पर्धा उद्घाटनासाठी घेऊन जाणे ही जोखमीची बाब शिक्षकांवर आल्याने नाराजीचा सूर उमटला आहे तसेच स्पर्धेत सहभागी खेळाडूंच्या स्वागतासाठी विद्यालय, महाविद्यालयांनी आपल्या परिसरातील मुख्य रस्त्यांवर होर्डिंग, कमानी उभारून स्पर्धा उत्साहात सहभाग नोंदवावा, असे सूचवल्याने काहींसाानाराजगीचा  सूर उमटला. वास्तविक, ६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यालय, महाविद्यालयांना पत्र पाठवून उपरोक्त सूचना केल्या होत्या.स्पर्धेला गर्दी जमावण्यासाठी विद्यार्थ्यांचा जिवाशी खेळ करण्यात आला .
उपसंचालक क्रिडा अधिकारी मोरे हे या स्पर्धेस अतिशय मेहनत घेत असून त्यांच्यासोबत क्रिडा अधिकारी लाकाडे सुध्दा मनापासून कार्य करत आहेत परंतू त्यांच्यात काम कमी आणि मलिदा लाटण्यासाठी दाखवलेली एक तत्परता अधिक दिसत आहे.हे अधीकारी बाहेरगावावरून आलेल्या गोरगरीब खेळाडुंना कामाला लावून पैशे वाचवत आहेत त्याबद्दल त्यांचे विशेष कौतूक वाटावे...!परंतू ह्याच कामांसाठी शासनाने ५०लाख दिलेत ना मग ...मुलांना कामाला लावून पैसे नेमके कोणाच्या खिशात जात आहेत..? क्रिडासंकुल मध्ये ग्राऊंड फुकट..,राहण्यासाठी रुम फुकट...दहा वीस बॅनर छापले ...की झाले का ५०लाख .त्यातच आता खेळाडूंच्या स्वागतासाठी विद्यालय, महाविद्यालयानी त्यांच्या परिसरातील मुख्य रस्त्यावर स्वागत होर्डिंग व कमानी उभारून स्पर्धेत उत्साह भरावा तसेच स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमास शहरातील १७ शाळांनी प्रत्येकी ५०० विद्यार्थी उपस्थित ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (मा.) यांनी मुख्याध्यापक, प्राचार्यांना काढल्याने एकच खळबळ उडाली आहे .एवढ्यावरच न थांबता माननिय जिल्हाधीकारी यांच्या आदेशाने प्रायोजकांकडूनही कोणी पाणी फुकट तर कोणाकडून जेवणाची व्यवस्था ..(नाही म्हणायची हिम्मत आहे का कोणाच्यात..!).मग कशाला लागतो अतिरिक्त फंड ...नेमके या अतिरिक्त फंडाचा कोणासाठी वापर करणार...? याबाबत आता संपुर्ण लातूर जिल्ह्यात चर्चा होवू लागली आहे. साहेब ...जेवढा दिला तेवढा खुप झाला...लातूरकरांच्या घामाचा पैसा असा वायफळ जावू देवू नका..अशी कळकळ सर्व सामान्य नागरिक करत आहेत.आपण मोठ्या मनाने लातूरकरांसाठी म्हणुन बोललात परंतू ,हे भ्रष्ट आणि मुजोर अधीकारी गोरगरिबांना फुकटचे कामाला लावून स्वत: पाच पाच हजार रुपयांचे सुट घालून फिरत आहेत.त्यामुळे आता अतिरिक्त निधी देण्यात येवू नये अशी सर्वसामान्य जनतेची भावणा होवू लागली आहे.क्रिडासंकुल मध्ये महिलांसाठी बाथरुमची लाईट बंद असली तर कित्येक महिने लाईट लागत नाही...क्रिडा ट्रॅक वर धुळीमुळे खेळाडुंच्या आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यासाठी का नाही दिला जिल्हाधिकारी यांनी फंड..?असे अनेक गंभीर प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडले आहेत तरी मा जिल्हाधिकारी साहेबांनी यावर गांभीर्याने लक्ष घालावे.
Previous Post Next Post