Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर शहरातील रेल्वे आरक्षण आजपासून १२ तास सुरु राहणार--

लातूर शहरातील रेल्वे आरक्षण आजपासून १२ तास सुरु राहणार--
                            -जुन्या रेल्वे स्टेशनवरील आरक्षण केंद्राच्या वेळेत वाढ --
              ---खासदार सुधाकर शृंगारे यांच्या मागणी नंतर आरक्षण केंद्राची वेळ वाढवली-=--


 ( लातूर-प्रतिनिधी )
                  --लातूर शहरातल्या जुन्या रेल्वे स्टेशनवरील आरक्षण कक्षाची वेळ वाढवून आठ तासावरून बारा तास करण्यात आली आहे .त्याची अंमलबजावणी आज पासून सुरुवात झाली आहे. शहरातील विद्यार्थी ,व्यापारी ,उद्योजक , सैन्य दलातील कर्मचारी अधिकारी यांच्या बरोबरच पर राज्यातून ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांच्या सोयीसाठी रेल्वे आरक्षणाची वेळ आठ तासावरून दोन शिफ्टमध्ये बारा तासापर्यंत करण्यात यावी ,अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती . त्यानुसार रेल्वे आरक्षण कक्षाची वेळ आज पासून बारा तासा पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना यांनी दिली आहे .
                   --लातूर शहरातून प्रवासासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थी , व्यापारी , कर्मचारी ,उद्योजकांची संख्या दिवसें दिवस वाढत असून त्यासाठी आरक्षण केंद्राची सुविधा किमान १२ तास करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती . नागरिकांची हि मागणी लक्षात घेऊन खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वे विभागाकडे १२ तास आरक्षण सुरु ठेवण्याची मागणी केली होती. त्यानुसार रेल्वे विभागाने सकाळी आठ ते रात्री आठ वाजे पर्यंत जुन्या रेल्वे स्टेशन वरील आरक्षण केंद्र सुरु ठेवण्यात येत असल्याचे आदेश काढले आहेत,त्याची अंमलबजावणी देखील आज पासून करण्यात येत आहे. तर लातूरच्या नवीन रेल्वे स्टेशनवरील आरक्षण केंद्र सकाळी आठ ते दुपारी चार वाजता पर्यंत पूर्वी प्रमाणेच सुरु राहणार आहे.                                                                                                
 -- लातूर रेल्वे स्टेशन शहरापासून दूर असल्याने आरक्षणासाठी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या नागरिकांना ऑटोचे भाडे किमान २०० रुपये मोजावे लागतात . या शिवाय जेष्ठ नागरिक , दिव्यांग व्यक्ती ,महिला यांना अडचणींचा सामना करावा लागत होता . नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आरक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वे विभागाला पत्र पाठवून जुन्या रेल्वे स्टेशनवरील आरक्षण हे बारा तास सुरु ठेवण्यात यावे अशी मागणी केली होती . खासदारांच्या मागणीला लक्षात घेऊन रेल्वे विभागाने आता दोन शिफ्टमध्ये सकाळी आठ पासून ते रात्री आठ पर्यंत आरक्षण कक्ष सुरुवात ठेवण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत . आरक्षण कक्षाची वेळ वाढविण्यात आल्याने लातूर शहरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे . जुन्या रेल्वे स्टेशनवरील हा आरक्षण कक्ष अगोदर सकाळी ८ ते २ आणि दुपारी ४ ते ८ या वेळेत सुरु होता आता तो आज पासून बारा तास सुरु राहणार आहे .
Previous Post Next Post