"मयुर मंत्री" क्रिकेट टिम ने ५१०००रुचे प्रथम पारितोषिक जिंकत शिवनेरी चषक-२०२३पटकावला
लातूर-सामाजिक कार्यात सदैव अग्रसेर असलेले,स्वभावाने अतिशय नम्र आणि मन मिळावू तसेच नांदेड़ आणि लातूर या ठिकाणी सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधून एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपणारे तसेच उत्कृष्ट बांधकाम व पारदर्शी व्यव्हार करणारे MVM Developer's चे मयुर मंत्री यांनी नुकतेच नादेड-अंबेजोगाई रिंग रोड,डि-मार्ट जवळ मळवटी चौकात सर्वात कमी दराने सर्वसामान्य जनतेला परवडणारे म्हणजे 12.50लाखां पासुन पुढे असलेल्या मयुर गॅलेक्सी-A प्रोजेक्ट मध्ये सर्वसामान्य लातूरकरांसाठी प्लॅट उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यामध्ये अवर्जुन मदत करणारे असे अतिशय मनमिळावू ,गोरगरिबांना सदैव मदत करणारे माननिय मयुर मंत्री यांच्या "मयुर मंत्री क्रिकेट "टिम ने लातूर मध्ये छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त सिद्धिविनायक क्रिकेट क्लब द्वारे 10फेब्रुवारी ते 19फेब्रुवारी दरम्यान आयोजीत करण्यात आलेल्या स्पर्धे मध्ये 51000रुचे प्रथम पारितोषिक जिंकुत शिवनेरी चषक 2023पटकावून लातूरच्या वैभवामध्ये मानाचा तुरा रवला.तर ३१०००रूचे दुसरे पारितोषिक श्रीहरी क्रिकेट टिम, लातूर यांनी पटकावले तर २१०००रुचे तृतीय पारितोषिक टर्निंग पॉइंट क्रिकेट टिम ने जिंकले आहे.या स्पर्धेमध्ये लातूर जिल्ह्यातील सात ते आठ क्रिकेट टीम नी सहभाग नोंदवला होता .प्रथम पारितोषिक जिकणार्या मयुर मंत्री क्रिकेट टिम चे मालक मयुरजी मंत्री यांनी सामनाविर/बेस्ट बॅट्समन/बेस्ट बॉलर तसेच मालिकाविर सौरभ शेवाळकर यांचे विशेष कौतुक केले व या टिम मधील क्रिकेटर ईरफान पटेल,विकास निरफळ,ईमरान सय्यद,समीर तांबोळी,सुशिल सुरवसे,अल्ताफ शेख,अवेज शेख,अजय चव्हाण,सतमान शेख,रिजवान सय्यद, शाहरुख शेख,भुषण मुंडे,महफुज मोमिन, सुजित पाटील,धिरज जेवळीकर,साजीद मोमिन,फुगल मामु,तोहित कुरैशी ,फरिद शेख यांचे अभिनंदन केले.