Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भामटेगिरी लवकरच येणार उघडकीस....!

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
बीड जि.प.मधील एका भामट्याची 
भामटेगिरी लवकरच येणार उघडकीस....!


*बीड/सुनिल सिरसाट

*अनेकांच्या कामात वळवळ करणाऱ्या भामट्याची चळवळ थांबून लवकरच एक खळबळ उडणार....!!*
------------------------------------
बीड जिल्हा परिषदे अंतर्गत एकेकाळी वायरची पिशवी घेऊन नौकरीत मराठवाड्याच्या राजधानीतून दाखल झालेला एक गोमटा उमेदवार पुढे ईतका भामटा निघाला की, त्या भामट्याने अल्पावधीतच आपल्या थोतांड संभाषण कौशल्याच्या जोरावर राजकीय पुढारी-कार्यकर्त्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील उत्कृष्ट दलाल म्हणून काम करत आजमीतिला स्वतःला चांगलेच नावारुपाला आणले आहे. हळूहळू त्याने आपला रंग दाखवायला सुरू केला. या भामट्याने आपल्या मर्जी विरोधात चालणाऱ्यांना असे काही चिमटे घेण्यास सुरुवात केली की, आजपर्यंत अनेकजण काही ऐक कारण नसताना विनाकारण रस्त्यावर आले आहेत. तर ज्यांचे काहीच खरे नव्हते असे कित्येकजण हिरो झाले आहेत. या पद्धतीने अनेकांच्या कामकाजात वळवळ करणाऱ्या भामट्याची भामटेगिरी लवकरच उघडकीस येणार असल्याने आता बीड जि.प. मध्ये एकच खळबळ होणार असल्याचे आता निश्चित आहे.
 कायद्याच्या भाषेत सांगायचे झाल्यास गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो गुन्हा करताना बारीक-सारीक स्वरूपात का होईना घटनास्थळी एखादा छोटा-मोठा पुरावा सोडून जातो. मग नेटून-कसून चौकशी करणारे अधिकारी असल्यावर एक ना एक दिवस तो अडकतोच......! असाच काहीसा प्रकार बीड जि.प. मधील एका भामट्याच्या बाबतीत घडला आहे. तो ज्या अविर्भावात गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून बीड जि.प. मधील प्रत्येक विभागात हस्तक्षेप करून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आपले उकळ पांढरे करत मोठ्या प्रमाणात आफरातफर करतो. नौकरीच्या अनुषंगाने विचार केलातर आजपर्यंत केवळ ऐखादे घर आणि गाडी शिल्लक पडावी ऐवढेच जेमतेम उत्पन्न....? परंतु आपल्या नातेवाईकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून या महाशयाने शंभर एकराच्या घरात जमीन, मोक्याच्या ठिकाणी प्लॉट, आणि बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) म्हणून प्रगती केली आहे. आजपर्यंत अफरातफर करताना, विविध प्रकरणात अनाठायी हस्तक्षेप करताना त्याला सातत्याने वाटते की, मी म्हणजेच सर्वकाही....!! मी काहीही केले तरी माझे काहीच होऊ शकत नाही. या अहंकारात तो इतका सुसाट सुटला की, त्याने आपले गाव-नाव, तालुका यासह शालेय जीवनातील प्रवेशनिर्गम, टी.सी. वरती खडाखोड करत पदोन्नतीसाठी चक्क आपल्या नसलेल्या जातीपातीची नोंद केली. महाशय एवढ्यावरच थांबले नाहीत. तर पुढे दोन वेगवेगळ्या तहसील कार्यालयातून हवे असलेल्या जातीचे प्रमाणपत्र मिळवून, हवी असलेली पदोन्नती मिळवली. शिवाय त्यापुढे जाऊन त्या पदोन्नतीसाठी शासन नियमाप्रमाणे हवी असणारी जात वैधता प्रमाणपत्र ही खोटे-नाटे शपथपत्र देऊन लांबचे नातेवाईक जवळ करत खोटी वंशावळ दाखवत जात पडताळणी समितीतील त्याच्यासारख्याच काही भामट्यांना आपल्याशी करत, हाताशी धरत जातवैधता प्रमाणपत्रही मिळवले. हा कहर एवढ्यावरच थांबला नाही. तर शासकीय नौकरीत कोणीही करणार नाही असा प्रताप या महाशयांनी त्यापुढे जाऊन केल्याचेही निदर्शनास आल्याचे पुरावे आता हाती लागल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीला नाव न छापण्याच्या अटीवर एकाने खबर दिली आहे. 
तेंव्हा चक्क या महाशयांनी आपल्या नौकरीतील सर्वात महत्त्वाचा पुरावा असलेल्या सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानावरच खडाखोड करत चक्क सेवा पुस्तिकेची दोन वेगवेगळी पाने तयार केली आहेत. अशा एक ना अनेक भानगडीचे पुरावे आमच्या प्रतिनिधीशी वार्तालाप केलेल्या खबऱ्याच्या हाती लागले असून त्याची पडताळणी खुद्द आमच्या प्रतिनिधींनी केल्याने लवकरच बीड जि.प.मध्ये एक मोठा स्फोट होऊन संबंधित भामट्याची भामटेगिरी उघडकीस येऊन लवकरच त्यास तुरुंगात खडी फोडण्यास जाण्याची वेळ निश्चित असल्याने आता केवळ त्या वेळेची वाट पाहणे औत्सुक्याचे झाले आहे......!!!!!.
Previous Post Next Post