गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी तात्काळ बांधकामे सुरू करावीत,अन्यथा घरकुल होणार रद्द.
मनपाचा इशारा.
लातूर/प्रतिनिधी: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लातूर शहरातील ज्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत अशांनी तात्काळ बांधकामे सुरू करावीत,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी बांधकामे सुरू केली नाहीत तर त्यांचे घरकुल रद्द केले जाईल,असा इशाराही देण्यात आला आहे.
शहरातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झालेली आहेत. परंतु काही नागरिकांनी अद्यापही कागदपत्रांची पूर्तता करून बांधकाम परवाना घेतलेला नाही. काही नागरिकांनी परवाना घेतलेला आहे परंतु प्रत्यक्षात बांधकाम सुरू केले नाही.ज्या लाभार्थ्यांनी बांधकाम परवाना घेतलेला नाही त्यानी लवकरात लवकर बांधकाम परवानगीसाठी कागदपत्र सादर करावीत त्याना बांधकाम परवाना तात्काळ दिला जाणार आहे. ज्यांनी बांधकाम परवाने घेतलेले आहेत त्यांनाही लवकरात लवकर बांधकामे सुरू करणे आवश्यक आहे.लाभार्थ्यांनी १५ फेब्रवारी २०२३ पर्यंत बांधकाम परवाने घेऊन घरकुलांचे बांधकाम सुरू करून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा.१५ दिवसात बांधकाम सुरू झाले नाही तर घरकुले रद्द होतील,असा इशाराही मनपाच्या वतीने देण्यात आला आहे.
आवास योजनेचा लाभ घ्यावा.
- मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे
"ज्या व्यक्तींना हक्काचे घर नाही अशांसाठी केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत घरकुले मंजूर झालेली आहेत. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.लवकरात लवकर कागदपत्रे सादर करून बांधकाम परवाना घ्यावा.ज्यांनी परवाना घेतलेला आहे त्यांनी काम सुरू करावे,असे आवाहन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे."
--