Ads by Eonads
उठ 'संपादका' जागा हो...
अधिकारी बनले मोठ्या पेपरच्या ताटा खालचे मांजर ..तुला भेटलयं गाजर..!
लातूर-लातूर शहरातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात सध्या साप्ताहिक आणि काहि दैनिक पेपर ची दयनीय अवस्था झाली आहे.त्याचे मुळ कारण म्हणजे मिळणार्या तुटपुंज्या जाहिराती परंतू आता ते पण मिळणे कठिण झाले आहे.करोना काळात सर्व सर्व पेपरवाल्यांनी देशावर ओढवलेल्या संकटाला आपले समजून काम केले, साप्ताहिक दैनिकांचे जाहिरातिचे बजटही कोरोना साठी वळवले याबाबत कोणीही काहीही म्हटले नाही ,तब्बल दोन ते तिन वर्षानंतर सर्व मार्केट चालू झाले खरे परंतू पेपर जसा आहे तसाच राहिला,ना त्याला कोणी जाहिराती देतो ना कोणी विचारतो त्याचे कारण म्हणजे जिल्हा माहिती अधीकारी .होय ....जिल्हा माहिती अधीकारीचं असे म्हणण्याचे कारण म्हणजे जाहिरातिच्या नियोजनाचा अभाव.शासनाने राबबीलेल्या कार्यक्रमासाठी प्रसिध्दी तर पाहिजे परंतू एक दोन नावाजलेल्या दैनिकांसोबत तेही टेबलाखाली घेवून मग त्यांना छोटे मोठे साप्ताहिक, दैनिक कसे दिसतील,मग लागतात ओरडायला ....यादी वर आहे का..?असेल तर 'अ' आहे का..? 'ब' आहे का..? मग त्यातल्या त्यात आपल्या जवळचे कोण..?टेबला खालून कोण देते..?हि सगळी गोळाबेरिज झाल्यानंतर यादी तयार होते आणि घरपोच मलिदा पोहचतो..!व्वा रे अधिकारी...जिवाचे रान करुन बातम्या लावतो साप्ताहिक,काही दैनिके , पोर्टल वाले ... का तर एखादी जाहिरात मिळेल तेही वर्षा दोन वर्षानी एखादे कार्यक्रम तेही मोठा असेल तर ...आणि जाहिरात मागतो कितीची ...तर तुम्ही द्याल तेवढ्याची मग काय चुकते त्यांचे ? आणि आता तर त्यांची हिम्मत एवढी वाढते साप्ताहिकाला जाहिरात देवू शकत नाही म्हणजे काय..? संपादक पत्रकार काय रोडवर पडलेत काय...?कोणी ही यावे आणि अपमान करावे आणि या अधिकार्यांनी करोडोंचा मलिदा खायचा...त्यामुळे उठ'संपादका'जागा हो...अधिकारी बनले मोठ्या पेपरच्या ताटा खालचे मांजर ..तुला भेटलयं गाजर..!