Ads by Eonads
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महात्मा बसवेश्वर कॉलेज जवळ आंदोलन
मागण्या मान्य नाही झाल्यास करणार महाविद्यालय बेमुदत बंद
लातूर
महात्मा बसवेश्वर कॉलेज जवळ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन करत असुन मागण्या मान्य नाही झाल्यास महाविद्यालय बेमुदत बंद करणार असल्याचे आंदोलन कर्मचार्यांनी सांगीतले आहे
मागण्या
1)सेवाअंतर्गत सुधारितासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवित करून सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करणे.
२) सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०.२० ३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे. ३ ) सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचान्यांना सातवा वेतन आयोग लागू करून विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालवधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करणे.
(४) विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे.. (५) २००५ नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे.
६) विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरुन त्या आधारे सातवा वेतन आयोगाची देतनश्रेणी लागू करणे.
आंदोलनाचे टप्पे व रूपरेषा -
१) दिनांक २ फेब्रुवारी, २०२३ पासून होऊ घातलेल्या विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षांच्या
कामकाजावर बहिष्कार, २) दिनांक १४ फेब्रुवारी २०१३ रोजी दुपारी २.०० ते २.३० अवकाश काळात निदर्शने.
३) दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ रोजी काळ्या फिती लावून कार्यालयीन काम करणे. ८) दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप.
५) दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पासून सर्व अकृषी विद्यापीठे व संलशित महाविद्यालये बेमुदत बंद