Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

केंद्रेकर साहेब कधीकाळी आपण जिल्हाधिकारी असताना याच बीड जिल्हावाशीयांनी आपल्या समर्थनार्थ मोर्चे काढले; आज आपण विभागीय आयुक्त असताना तेच लोक आपल्या विरोधात मोर्चे काढतायेत आत्मपरीक्षण करा जरा......!!

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
केंद्रेकर साहेब कधीकाळी आपण जिल्हाधिकारी असताना याच बीड जिल्हावाशीयांनी आपल्या समर्थनार्थ मोर्चे काढले; 
आज आपण विभागीय आयुक्त असताना तेच लोक आपल्या विरोधात मोर्चे काढतायेत आत्मपरीक्षण करा जरा......!!

     *बीड/सुनिल सिरसाट*




सुनील केंद्रेकर साहेब आपण कधीकाळी याच खुंखार बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होतात. आपल्या कार्याच्या जोरावर अल्पावधीतच आपण जिल्हावाशियांच्या मनावर राज्य केले. म्हणून आपली बदली होणार म्हणताच अख्ख्या जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस त्यावेळी रस्त्यावर आला आणि आपल्या समर्थनार्थ जिल्हाभरातून मोर्चे निघाले. शेवटी कधी ना कधी बदली ही अटळ असल्याने आपण एक दिवस बीड जिल्हा सोडून गेलात. परंतु काही वर्षांनी आपण मराठवाड्याचे विभागीय आयुक्त म्हणून आलात आणि पुन्हा योगायोगाने बीड जिल्हावाशियांना पूर्वीपेक्षा फार जास्तीच्या अधिकारांचा मोठा अधिकारी म्हणून लाभलात. त्यामुळे मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्याचे सांगता नाही येणार. परंतु बीड जिल्ह्यातील लोकांना मात्र कमालीचा आनंद झाला. सांगता येणार नाहीत ईतक्या प्रमाणात लोकांच्या अपेक्षा वाढल्या. आता सारकाही गपगुमान सुरळीत होणार. या आशेने मायबाप जनता विश्वासाने स्थिरावली. परंतु हा टाकलेला वा असलेला दृढ विश्वास लवकरच अंध: विश्वास ठरेल याची मात्र कल्पना कोणालाही नव्हती.
आश्चर्य यात आहे की, एकेकाळी आपणास डोक्यावर घेऊन नाचणारा बीड जिल्हा आज आपल्या विरोधात मोर्चा काढून आक्रोश व्यक्त करतोय. यावरून कुणी काय समजायचे ते समजून जाईल कदाचित.....! परंतु तुमच्यावर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. असा सूर मात्र संपूर्ण बीड जिल्ह्यातून ऐकावयास मिळतो आहे.
    केंद्रेकर साहेब संपूर्ण मराठवाड्याचे काही सांगता येणार नाही. परंतु बीड जिल्हावाशियांच्या वाढलेल्या अशा-अपेक्षांवरती मात्र आपण पूर्णतः पाणी फेरले, आणि आपल्या या बदललेल्या स्वभावाच्या आणि कार्यप्रणालीच्या बदल्यात कधीकाळी आपल्या नावाचा "जल्लोष" करणाऱ्या बीड जिल्ह्यात नुकताच काल-परवा आपल्या विरोधात मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करत जो " रोष " व्यक्त केला गेला. यावरून एक मात्र निश्चित वाटते की, कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची आपल्यावर खरोखरच वेळ आलीय हे आता सिद्धच होत आहे. तेव्हा ते कराच एकदा.........!
        सुनील केंद्रेकर साहेब संपूर्ण बीड जिल्ह्यात सर्व पक्षीय राजकारण्यांसह तळागाळातला सर्वसामान्य माणूस आज बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अजित पवार यांच्या विरोधात सातत्याने गेल्या वर्षभरापासून यांना त्या माध्यमातून, विविध प्रकरणांवरून ओरडतो आहे. त्यात अलीकडच्या तीन-चार महिन्यांपासून तर जलजीवन मिशनच्या माध्यमातून सीईओ पवार यांच्या विरोधात तर जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा म्हणून तालुका-जिल्हा-विभागीय-राज्यस्तरीय अशा सर्व स्तरातील विविध दैनिकांसह ई-मिडीया चॅनलच्या माध्यमांतून त्यांच्या भ्रष्ट-निकृष्ट कारभाराचा पाढाच वाचला जातोय. तरीही आपण *हाताची घडी तोंडावर बोट ठेवून मूक गिळून गप्प आहात.* का.....? कशासाठी......?? यामागे नेमके काय गौडबंगाल आहे.....??? सातत्याने एवढी ओरड सुरू असताना प्रशासनाची-सरकारची बदनामी होत असताना शासन निर्णया अधीन राहून काही कारवाई करण्याऐवजी आपण उलट सीईओ पवारांना पाठीशी घालतानाच दिसतायेत. असा घणघाती आरोप आपल्यावर होत असताना आपणास काही एक फरक पडत नाही किंवा आपण त्यावर ब्र-शब्द बोलत नाहीत. यामुळे तर शंका-कुशंका दिवसेंदिवस वाढतच जात आहे. तेंव्हा आता हे जिल्हावाशियांच्या सहनशीलतेबाहेर जात आहे. सरकारही तुमच्या मूळ प्रतिमेवर जात गप्प आहे. कदाचित अजून सरकार दरबारी आपल्यातील बदलाची चुणूक लागली नसावी. आपण कशासाठी पवारांची पाठराखण करत आहात हे मात्र फक्त आपल्यालाच ठाऊक.....! परंतु आपल्या या भूमिकेमुळे बीड जिल्ह्यात पवारांच्या माध्यमातून जो नंगानाच सुरू आहे. तो आपल्या कृपाशीर्वादानेच असून आपण यात कशावरून सामील नसाल....? हा संशय मात्र आता अलीकडे बळावत चालल्याचे चित्र सध्याच्या एकंदरीत वातावरणावरून सबंध बीड जिल्ह्यात दिसून येत आहे. केंद्रेकर साहेब गेली काही दिवस जनता केवळ सीईओ अजित पवार यांना हाकला अशीच मागणी करत होती. परंतु आपल्या संशयास्पद भूमिकेमुळे लवकरच येणाऱ्या काळात सीईओ अजित पवारांसह आपल्या हकालपट्टीची मागणी होऊ नये म्हणजे नवलच.........! तेंव्हा अजूनही वेळ गेलेली नाही. जर आपण पहिलेच केंद्रेकर असाल, आपला कशासीही तीळमात्र मात्र संबंध नसेल,, तर मात्र उचला कारवाईचा बडगा आणि व्हा स्वतःही या आरोपा-प्रत्यारोपांच्या जोखडातून मोकळे आणि करा आम्हा बीड जिल्हावाशियांनाही या अशा अकार्यक्षम आणि आपलीच मनमानी चालवणाऱ्या सीईओच्या कचाट्यातून मुक्त.......!! तर अशीच काहीशी मागणी सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यातून जागोजाग जोर धरत असल्याचेच आढळून येत आहे. तेंव्हा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे ते केवळ आपल्या भूमिकेकडे.....!!!!!
Previous Post Next Post