गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन च्या माध्यमातून करोडोंचा निधी गोळा
साप्ताहिक पेपर ला डावलले ..म्हणे जाहिरात देवू शकत नाही..!
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा उपोषणाचा ईशारा
छत्रपती शिवाजी महाराज चषक व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी 50लाखांचा निधी तर अतिरिक्त निधी स्थानिक प्रायोजकांमार्फत व स्थानिक आमदार निधी च्या माध्यमातून उभारणार
लातूर-लातूर शहरामध्ये महाराष्ट्रातील व्हॉलीबॉल खेळाच्या खेळाडूंना राज्य स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी तसेच खेळाडूंना व क्रीडा प्रेमी प्रेक्षकांना दर्जेदार खेळाडूंचे कौशल्य व खेळ पाहण्यास मिळावा याकरीता महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन द्वारा छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धा 2022-23 चे प्रथमच लातूर शहरामध्ये आयोजनदि.14 ते 18 फेब्रुवारी 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चषक व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी शासन निर्णयातील तरतुदीनुसार रु. 50.00 लक्ष इतकी तरतुद करण्यात आली आहे. शासन निर्णयात नमुद करण्यात आलेल्या बाबीनुसार सदरचा निधीमधून खेळाडु, मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच तथा तांत्रीक पदाधिकारी यांचा निवास व भोजन, प्रवास खर्च, खेळाडूंना रोख रक्कमेची बक्षीसे यासोबतच प्रेक्षक गॅलरी, स्टेज, मंडप तसेच प्रकाशझोत व्यवस्थेचा खर्च भागविण्यात येणार आहे.
सदरची तरतूद ही 2013 च्या शासन निर्णयानुसार करण्यात आलेली आहे. हा निधी 2023 च्या वाढीव दरानुसार अपूरा पडणार असल्याकारणाने मा.पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या दि.06 फेब्रुवारी 2023 रोजीच्या आढावा बैठकीमध्ये वाढीव तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले असून अद्याप पर्यंत तसा शासन निर्णय निर्गमीत करण्यात झालेला नाही. सदर बैठकीमध्ये ठरल्यानुसार अतिरीक्तचा निधी हा स्थानिक प्रायोजकांमार्फत व स्थानिक आमदार यांच्या स्थानिक विकास निधी च्या माध्यमातून करण्यात यावी असे मा.पालकमंत्री महोदयांनी सुचविले आहे. त्यानुसार अतिरीक्त आवश्यक निधीची तरतुद ही प्रायोजकांमार्फत व स्थानिक आमदार महोदयांना पत्र देऊन उपलब्ध करण्याचे प्रयत्न चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
तब्बल एक ते दिड करोड़ रुपए बजट असलेल्या या व्हॉलीबॉल स्पर्धेने एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे. घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदे मध्ये सर्व बाबीवर चर्चा करण्यात आल्या नंतर स्त:हुन तेथील अधिकार्याने स्पर्धेच्या व्यापक प्रसिद्धि साठी जाहिराती देणार असल्याचे सांगीतले खरे परंतू फक्त अ,ब,क दैनिकालाचं जाहिराती देणार असल्याचे सांगीतले आणि एकच वाद निर्माण झाला.तेथिल बसलेल्या साप्ताहिक पेपर चे संपादकांनी याबाबत विचारणा केली असता त्यावर आपल्या बुध्दीची पातळी दाखवत आम्ही देवू शकत नाही असे ठासुन जिल्हा माहिती अधीकारी युवराज पाटील यांच्यासमोर सांगीतले यामुळे आता साप्ताहिक पेपर चालवणार्या हजारो संपादक पत्रकार जाहिराती पासुन वंचीत राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.यावर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे मराठवाड़ा अध्यक्ष विष्णु आष्टीकर यांनी पुढाकार घेतला असुन यावर वेळीच तोडगा नाही निघाल्यास क्रिडा संकुल समोर उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगीतले
"साप्ताहिक पेपर चालवणार्या संपादकांचा यामुळे अपमान झाला असुन साप्ताहिक पेपर ला जाहिराती न देण्याची अडमुठी भुमिका घेणार्या अधिकार्याने प्रथमत:त्यांनी माफी मागायला पाहिजे आणि त्यांची लातूर वरुन तात्काळ बदली करावी ,जर दोन दिवसात या विषयावर तोडगा नाहि काढला तर,क्रिडा संकुल समोर हजारोंच्या संखेने उपोषणास बसणार".
विष्णु आष्टीकरफोटो क्राईम न्यूज,मुख्य संपादक तथा मराठवाड़ा अध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य मुंबई
"साप्ताहिक पेपर आणि दैनिक पेपर असा दुजाभाव करणार्या अधिकार्याला वेळीच त्याची जागा दाखवणे अवश्यक बनले आहे, हजारोंच्या नाही तर संपुर्ण महाराष्ट्रातून संपादक पत्रकार येतील यात काही शंका नाही."
लहु शिंदे
मुख्य संपादक तथा जिल्हाअध्यक्ष,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य मुंबई