गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर मध्ये रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनने सामाजिक उपक्रम सोडून सळई ,सिमेंट विकण्याचा घेतला पुढाकार
लातूर-समाज विकासाच्या कामात रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्याचे योगदान मोठे आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, सामाजिक, कला, जलसंवर्धन या क्षेत्रांत केलेले कार्य विशेष वाखाणण्याजोगे आहे. तळागाळातील समाजासाठी रोटरीतर्फे राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहे. ही संस्था सामाजिक क्षेत्रातील गुरू असल्याचे आता लपुन राहिले नाही याकार्याला हडताळ फासत नुतन अध्यक्षा ने सामाजिक उपक्रम सोडून सळ ई ,सिमेंट विकण्याचा जणू पुढाकार घेतल्याचे आता बोलले जावू लागले आहे. लातूर मध्ये रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लातूर बिल्ड एक्स्पो २०२३ चे उद्घाटन देशाचे माजी गृहमंत्री मा. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते शुक्रवार दि. ३ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष रो. विरेंद्र कुंडीपल्ले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
वेगाने वाढल्या लातूर शहरातील बांधकाम क्षेत्रातील सर्व वस्तू व सेवांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, नागरिकांना आपले घराचे स्वप्न सत्यात उतरविणे सोपे व्हावे, यासाठी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिनांक ३ ते ६ फेब्रुवारी दरम्यान टाऊन हॉलच्या मैदानावर हा एक्सपो संपन्न होणार आहे. या करीता लातूर शहरात प्रथमच Greman Hanger चा वापर करण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्रातील सिमेंट, स्टील, फर्निचर यासह सोलर होम ऑटोमेशन, लॅडस्केप आदीपासून बांधकामासाठी स्वस्त लोन, आधुनिक नर्सरी, घरात लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू, दरवाज्याचे विविध प्रकार, नवीन टेक्नॉलॉजी, ई. या संदर्भातील सर्व माहिती देणारे स्टॉल या एक्सपोमध्ये असणार असल्याचे सांगीतले .
लातूर मध्ये काही दिवसापुर्वी क्रिडाई च्या माध्यमातून लातूरकरांसाठी अल्प दरामध्ये फ्लैट उपलब्ध करुन देण्यात आले होते त्यामध्ये लातूर मधील नामांकित बिल्डरांनी सहभाग नोंदवला होता.त्याएक्स्पोला कारपोरेट लूक ही देण्यात आले होते त्यांचा उद्देश्य ही स्पष्ट होता परंतू रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्यावतीने लातूर बिल्ड एक्स्पो २०२३ चे उद्देश्य मात्र निव्वळ व्यापार्यांना फायदा करुन स्वत:चे उकळ पांढरे करण्याचाच असल्याची जोरदार चर्चा लातूर शहरामध्ये होवू लागली आहे.