888
गुन्हेगारीचा पर्दाफाश….!शासकीय गायरान जमिनीवर घर बांधल्याने हासेगावचे उपसरपंच अपात्र
लातूर, दि.५- औसा तालुक्यातील हासेगाचे उपसरपंच सलीम अहमद शेख यांनी गायरान जमिनीवर घर बांधल्याचे सिध्द झाल्याने त्यांचे पद जिल्हाधिकार्यांसमोर झालेल्या सुनावणीत अपात्र ठरविण्यात आले आहे.
हासेगाव येथील गायरान जमिनीवर सलीम शेख यांनी घर बांधल्याची तक्रार येथील सेवालयाचे संस्थापक प्रा. रवी बापटले यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्याकडे केली होती. यामुळे त्यांचे उपसरपंचपद रद्द करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली होती. या प्रकरणात सलीम शेख यांचेही म्हणणे ऐकण्यात आले. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सबळ पुराव्यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सलीम शेख यांचे उपसरपंचपद अपात्र घोषित केले आहे.
या प्रकरणी प्रा. रवी बापटले यांच्यावतीने ऍड. नीलेश मुचाटे यांनी जिल्हाधिकार्यांपुढे युक्तिवाद केला.
888.