8
पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांचा गौरव सोहळा
लातूर-नुकतेच उदगीर शहर पोलिस स्टेशनला बदली झालेले पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या जळकोट येथील कार्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंढे यांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
पोनि परमेश्वर कदम यांनी येथील पोलिस वसाहतीतील कर्मचाऱ्यांना ताजा आणि चांगला भाजीपाला मिळावा म्हणून स्वखर्चातून परिसरात परसबाग तयार केली. त्यात विविध फळांच्या झाडांची लागवड केली. हे पाहून उपजिल्हाधिकारी प्रवीण मँगशेट्टी, तहसीलदार सुरेखा स्वामी, मुख्याधिकारी भरत राठोड यांनी त्यांचा सत्कार केला.
जळकोटपासून एक किमी अंतरावर पोलिस कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या वसाहत परिसरात झाडे-झुडपे वाढली होती. त्यामुळे नेहमी सर्प दर्शन होत असे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांत भीती निर्माण झाली होती.
दरम्यान, पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी स्वखर्चातून स्वच्छता करून घेतली. तसेच वसाहतीतील पोलिस कर्मचाऱ्यांना एकत्र करून स्वच्छता मोहीम राबविली. या परिसरात विविध फळांची ३०० झाडे लावली. ही रोपे पाण्याअभावी वाळू नयेत म्हणून ठिबकची सोय केली.
'तसेच परसबाग निर्माण केली. पोनि कदम यांनी विविध गुन्ह्यांतील तपास करण्याबरोबरच शांतता कायम राखण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. हा गौरव झाल्याबद्दल पोलिस निरीक्षक • परमेश्वर कदम यांचे स्वागत करण्यात येत आहे.
888