मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयकॉन हॉस्पिटलच्या वतीने भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर
--डॉ.प्रमोद घुगे
*लातूर/ प्रतिनिधी
गरजूंनी व सर्वसामान्य रुग्णांनी आवर्जून शिबीराचा-तपासण्यांचा लाभ घ्यावा--डॉ.सौ.प्रतिभा घुगे
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर येथील आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल क्रिटिकल केअर डायलिसिस सेंटर तर्फे उद्या दि. 09/02/ 23 गुरुवार रोजी सकाळी 10 ते दुपारी 02 या वेळेत भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचा जास्तीत जास्त गरजवंतांनी आणि रुग्णांनी लाभ घ्यावा लाभ असे आवाहन हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रमोद घुगे व डॉ.सौ.प्रतिभा घुगे यांनी केले आहे.
लातूर-परभणी-बीड मधील ऐकमेव नामांकित किडनी तज्ञ म्हणून नावलौकिक तथा परिचित असलेले डॉ.घुगे हे आपल्या वैद्यकीय सेवेतून मुळातच सामाजिक दायित्वाची जपणूक करतात. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या रुग्णांच्या पाठीशी हे डॉक्टर दाम्पत्य सातत्याने खंबीर उभे असते. अधूनमधून या ना त्या निमित्ताने ते लातूर शहरासह ग्रामीण भागात वेगवेगळी आरोग्य शिबिरे घेतात. त्यातून आतापर्यंत हजारो गरजवंतांना आणि रुग्णांना चांगलाच फायदा-लाभ झालेला आहे.
तेंव्हा उद्याही ना. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयकॉन हॉस्पिटलच्या वतीने भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तेंव्हा सर्वात श्रेष्ठ दान असलेल्या रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन आणि आपले एक सामाजिक दायित्व म्हणून रक्तदात्यांनी रक्ताचे दान करण्यासाठी सहभाग घेऊन रक्तदानासाठी उपस्थित राहावे, तर ऐरवी विविध तपासण्यांचे आरोग्य नियमानुसारचे दर सर्वांनाच परवडतात असे नसल्याने आम्हीही आमचे दायित्व जपत रक्त, एक्स-रे, सोनोग्राफी ई. विविध तपासण्यासाठी नेहमीच्या दरापेक्षा उद्या 20 ते 30 % टक्के सूट देऊन संबंधित तपासण्या करणार आहोत. तर या सोबतच शुगर, रक्तदाब यासह काही निवडक-मोजक्या तपासण्या मोफत करणार असल्याने या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.घुगे दाम्पत्यांनी केले आहे.