गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
१.१३ कोटींच्या बनावट नोटांसह पोलिसांकडून टोळी जेरबंद,'बच्चो की बँक'च्या नोटाचा वापर
लातूर मधील एका माजी नगरसेवकाचा समावेश...
लातूर-औंढाऔंढानागनाथ(जि. हिंगोली) : येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात औंढा पोलिसांनी १.१३ कोटींच्या बनावट नोटा('बच्चो की बँक' च्या नोटाचा वापर) वापरून फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद केले असून या प्रकरणामध्ये लातूर मधील दोन आरोपीचा समावेश असून त्यापैकी एक आरोपी हा माजी नगरसेवक असल्याच्या चर्चेने लातूर मध्ये एकचं खळबळ उडाली आहे. या टोळीतील फरार आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
औंढ्यात बुधवारी रात्री मुजफ्फर नजीर शेख या महिलेने गस्तीवरील पोलिसांना थांबवत बनावट नोटा देऊन बारा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता एका बॅगमध्ये ३९ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळल्या. चौकशी सुरू केली असता बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव • आरोपींनी एक लाखाचे तीन लाख देतो म्हणून बारा लाख पन्नास हजार रुपये घेऊन त्याऐवजी ३९ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा देऊन पळ काढल्याचे शेख यांनी सांगितले.
येथील दिवसभर प्रकरण चर्चेत
या प्रकरणात आधी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार होता. यात महिलेलाही आरोपी करायचा प्रयत्न होता. मात्र, नंतर महिलेला फिर्यादी करून तक्रार नोंदविण्याचा निर्णय झाल्याने अख्खा दिवस हे प्रकरण चर्चेत राहिले.
मुजफ्फर नजीर शेख औरंगाबादच्या रहिवासी आहेत. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी आरोपींचा मोबाइल नंबर ट्रॅक केला. तेव्हा आरोपी रिसोडच्या पुढे गेल्याची माहिती मिळाली. याबाबत हिंगोली, वाशिम व बुलढाणा पोलिसांना कळवून नाकाबंदी करण्यात आली. शेवटी खामगाव पोलिसांनी आरोपींना अटक केली. खामगाव येथील ज्ञानप्रकाश परमेश्वर जांगीड (रा. अभयनगर), लखन गोपाल बजाज व राहुल चांदूसिंग ठाकूर (दोघे रा. घारीपुरा नाका) यांना ताब्यात घेऊन
'बच्चो की बँक' च्या नोटा आरोपींनी हुबेहूब नकली नोटांची नक्कल केली नाही, तर खेळण्यातील बच्चो की बँक असे लिहिलेल्या नोटा वापरल्या. त्या नोटांच्या बंडलावर वरची व खालची एक नोट ही खरी ठेवली होती.
या घरांची झडती घेतली असता ७५ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या. याप्रकरणी खामगाव येथील तीन आरोपींसह इतर सहा आरोपी सोमनाथ बाबूराव दाबके (रा. कोल्हेनगर लातूर), सुनील नरहरी जंगवाड (रा. संभाजीनगर, लातूर), विनोद शिवाजीराव शिंदे (रा. मुळा गल्ली, उदगीर), विलास पंढरीनाथ वडजे (रा. विष्णुपुरी नांदेड), केशव विश्वनाथ वाघमारे (रा. उद्योगनगर, नांदेड), गुणाजी गौनाजी मुधले (रा. रामनगर, नांदेड) यांना ताब्यात घेण्यातआले आहे