गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
मयत सदस्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून.... ; केला ६५ लाखांचा अपहार, ९ जणांविरोधात गुन्हा दाखल
जय भवानी चॅरिटेबल ट्रस्ट मधील प्रकार
लातूर-
मयत सदस्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन निवडणुक झाल्याची कागदपत्रे तयार करुन धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल केल्याचा व ट्रस्टकडे जमा असलेल्या रोख रक्कम व सोन्या चांदिचे दागिने असा ६५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार जयभवानी चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये उघडकीस आला आहे.
.
या संदर्भात तपास अधिकारी प्रशांत लोंढे यांनी दिलेली माहिती अशी की, जय भवानी चॅरिटेबल ट्रस्ट, झिंगण अण्णा गल्ली, लातूर या नावाने एक ट्रस्ट येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदकृत ट्रस्ट आहे. ट्रस्टच्या, श्याम विठ्ठल पवार (वय ५३, धंदा व्यापार), धुयप्या नागनाथ आप्पा जयशेट्टी ( वय ६०, धंदा व्यापार), जीवन तमनअप्पा मेघशेट्टी ( वय ५५. धंदा व्यापार), महादेव गोविंदराव गायकवाड
(वय ५२, धंदा व्यापार, चौघे रा. झिंगनप्पा गल्ली, लातूर), मुस्तफा इस्माईल घंटे (वय ५६, धंदा व्यापार, रा. आझाद चौक, लातूर), व्यंकटराव मारुतीराव वाघमारे (वय ५६, धंदा व्यापार, रा. भोई गल्ली, लातूर), संजय पांडुरंग वेदपाठक (वय ५२, धंदा व्यापार, रा. झिंगनाप्पा गल्ली, लातूर), रविकिरण रावसाहेब देशमुख (वय ५७, धंदा व्यापार, रा. विकास नगर, एमआयडीसी रोड, लातूर) आणि नागनाथ सलवय्या स्वामी (वय ४०, धंदा कर सल्लागार, रा. बलदवा नगर, लातूर) यांनी संगणमत करून दि. २५ ऑक्टोबर २०२१ व २०१३ ते २०२१ दरम्यान जय भवानी चारिटेबल ट्रस्ट झिंगनआप्पा गल्ली लातूरचे मयत सदस्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून त्या खऱ्या असल्याचे भासवुन तसेच संगणमताने कट रचून निवडणूक झाल्याचे कागदपत्रे तयार करून धर्मादाय आयुक्त कार्यालय लातूर येथे
बदल अर्ज केला. तसेच २०१३ ते २०२१ ट्रस्टकड़े जमा झालेली देणगी व गोन्याचांदीचे दागिने एकूण किमत अविनंती केली. त्यानंतर, अँड. करीव समितीचे विधी ६ ते ६५ लाख रुपयांचा अपहार केला, अशी तक्रार कैलास रामभाऊ (४०, व्यवसाय शेती व व्यापार, रा. खबल्ली, सा. जी. (लातूर) यांनी गांधी चौक पोलिसांत दिली. या तक्रारच्या आधारे गुरमे १०/२३ कलम १९२, १९३ ४०६, ४०९, ४२०४६५४४६८ ४७१, १२०(ब) भाव अन्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा कलम १५६ (३) प्रमाणे प्रथमवर्ग लातूर यांचे न्यालयातून आदेश पारित होताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास सपनी प्रशांत लोंढे हे करीत आहेत